Train Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कामाच्या शोधात घरातून निघाला, रस्त्यात झाला मृत्यू; बातमी ऐकून आईनेही प्राण सोडला

प्रवासादरम्यान दोघेही ट्रेनमधून खाली उतरले आणि परत आलेच नाहीत

Pramod Yadav

सिमडेगा, झारखंड येथून कामाच्या शोधात गोव्याकडे एक तरुण येत होता. दरम्यान, महाराष्ट्रातील माणगाव येथे त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एवढेच नव्हे तर त्याच्यासोबत असणारा दुसरा तरुण बेपत्ता झाला.

मुलाचा मृत्यू झाल्याचे ऐकताच त्याच्या आईने प्राण सोडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

प्रफुल्ल टोप्पो (रा. पाकर्तंड, पालेदिह महाकुर्तोली) असे या तरुणाचे नाव असून, राजेश लाक्रा असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रफुल्लचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

पलादीह महाकुर्तोली येथील पाच तरुण प्रफुल्ल टोप्पो, राकेश लाक्रा, माक्सेन लाक्रा, फिलेमन टोप्पो आणि तेजा कोस्टा 4 जानेवारी रोजी रेल्वेने गोव्याला जात होते. मात्र शनिवारी रात्री प्रफुल्ल माणगाव स्थानकाजवळ ट्रेनमधून उतरला. राजेशही त्याच्यासोबत खाली उतरला. दोघेही परत आले नाहीत.

माणगाव पोलिसांनी रविवारी सकाळी प्रफुल्लचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, प्रफुल्लच्या मृत्यूच्या कारणाबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

प्रफुल्लच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी कुटुंबीयांना फोनवरून घटनेची माहिती दिली. प्रफुल्लच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रफुल्लच्या आईनेही प्राण सोडला.

दरम्यान, राजेश अजूनही बेपत्ता असून, इतर तीन मजूर रविवारी गोव्यात दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

खरी कुजबुज: गावडे पर्यायाच्‍या शोधात!

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! मूर्ती स्थापनेचे नियम आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT