Bihar Girl Drowning Death Incident Goa Hotel  Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Death: दुर्दैवी! हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; हडफडे येथील घटना

Bihar Girl Drowning Death Incident Arpora Hotel : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील ५ वर्षांची मुलगी संध्या कुमारी हिचा हडफडे येथील हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.

Sameer Panditrao

पणजी: बिहारमधील मुझफ्फरपूर येथील ५ वर्षांची मुलगी संध्या कुमारी हिचा हडफडे येथील हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल संध्याकाळी ४.३० वा. घडली असून हणजूण पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थानाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना घडली तेव्हा तेथे जलतरण तलावाशेजारी हॉटेलचा जीवरक्षक नव्हता. हॉटेलमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे त्या ठिकाणी कोणी नसल्याचे सिद्ध झाले आहे. ही घटना घडली तेव्हा तेथे जलतरण तलावाशेजारी हॉटेलचा जीवरक्षक नव्हता. हॉटेलमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे त्या ठिकाणी कोणी नसल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ५ वर्षांची मुलगी आपल्या पालकांसमवेत जलतरण तलावात काल दुपारी उतरली होती. त्यानंतर तिचे पालक व ती हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाले तेव्हा ती सुद्धा त्यांच्याबरोबर गेली. काही वेळाने ती एकटीच पुन्हा जलतरण तलावाकडे येऊन उडी मारली आणि ती पाण्याखाली गेली.

मात्र, तिच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. ती पाण्यावर तरंगताना दिसली, तेव्हा एकच खळबळ उडाली. त्वरित या मुलीला हणजूण येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना इस्पितळातून देण्यात आली. त्यानंतर पुढील कारवाई पोलिसांनी केली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक साहिल वारंग करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT