Drowning Cases: धबधबा बघायला गेल्यावर पाण्यात उतरला, अंदाज चुकला अन् बुडाला; 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Crime: तिलारी येथील ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (३ एप्रिल) उघडकीस आली.
Drowning Cases
Drowning CasesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तिलारी येथील ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (३ एप्रिल) उघडकीस आली. अभिनव चंद्रशेखर अंकलगी (वय २१) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. अभिनव बेळगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिनव गुरूवारी आपल्या चार मित्रांसोबत फिरायला तिलारी परिसरात गेला होता. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ग्रीन व्हॅली धबधब्याजवळ पोहोचल्यावर सर्व मित्रांनी पाण्यात पोहण्याचा निर्णय घेतला.

पोहत असतानाच अभिनव खोल पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता न येत असल्याने त्याचा जीव गेला.

Drowning Cases
Goa News: रामनवमी निमित्त सावईवेरेतील अनंत देवस्थानात सजवलेला शेषशायी अनंत

घटनेनंतर त्याच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. तत्काळ चंदगड येथील ‘पास रेस्क्यू फोर्स’ला पाचारण करण्यात आले. संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या शोधमोहिमेला यश न आल्यानं शोधमोहिम थांबवली.

दुसऱ्या दिवशी, गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर दुपारी एक वाजता अभिनवचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa vs Oman practice match
America Double Murder Case
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Sexual Assault Case Khorlim Mapusa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com