Drowning Cases: चिंताजनक! गोव्यात 2 महिन्यात 15 जणांचा बुडून मृत्यू; पाण्यात उतरताना खबरदारी घेण्याची गरज

Drowning Death Cases Goa: दक्षिण गोव्यात यावर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारी या पहिल्या दोन महिन्यांत एकूण १५ जणांना जलसमाधी मिळाली.
Drowning Case
Drowning CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: खबरदारी न घेता पाण्यात डुबकी मारणे आता अनेकांच्या जिवावर बेतू लागले आहे. दक्षिण गोव्यात यावर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारी या पहिल्या दोन महिन्यांत एकूण १५ जणांना जलसमाधी मिळाली. मागच्या वर्षी २०२४ मध्ये या जिल्ह्यात एकूण ५८ जणांचा बुडून मृत्यू झाला होता. यात पर्यटक तसेच स्थानिकांची समावेश होता.

धोकादायक ठिकाणी पोहणे म्हणजे जीव गमावून बसणे असेच आहे. दारूच्या नशेत काहीजण पाण्यात पोहण्याचे धाडस करतात व जीव गमावून बसतात. पोलिस तपासात ही बाब समोर आली आहे. 

मागच्या वर्षी २०२४ मध्ये कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वांत जास्त १० जणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्याखाली फोंडा पोलिस स्थानकात ९ प्रकरणे नोंद झाली होती.  केपे व म्हार्दोळ प्रत्येकी ६ अशी प्रकरणे घडली होती. कुडचडे, काणकोण, वास्को येथे प्रत्येकी ५, मायणा-कुडतरीत ३ घटना घडल्या होत्या. कोलवा, फातोर्डा , मुरगाव व कुळे येथे प्रत्येकी २ तर वेर्णा येथे एकाचा बुडून मृत्यू झाला होता.

दोन महिन्यांतील घटना

यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात कुडचडे व फोंडा येथे प्रत्येकी ३, तर कोलवा व म्हार्दोळ प्रत्येकी २ तर  मायणा-कुडतरी, फातोर्डा, केपे, काणकोण, वेर्णा व कुळे पोलिस ठाण्यात प्रत्येकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Drowning Case
Drowning Case:...अखेर शेळवणच्या विनय देसाईचा मृतदेह सापडला; मित्रांसोबत पोहण्याचा मोह जीवावर बेतला

पोलिस, जीवरक्षक हतबल

किनारपट्टीवर दृष्टीचे जीवरक्षक तसेच पर्यटन पोलिस तैनात असतात. पाण्यात उतरू नका असे ते वारंवार पर्यटकांना बजावतात सुद्धा. मात्र पर्यटक त्याकडे अनेकदा दुर्लक्षच करतात व बुडून आपला प्राण गमावून बसतात. आमचाही अनेकवेळा नाईलाज होतो, असे पोलिस सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com