5 of the passengers from England, Sharjah were corona positive

 

Dainik Gomantak

गोवा

Goa Corona Updates: इंग्लंड, शारजाहमधून आलेल्या प्रवाशांपैकी 5 जण कोरोनाबाधित!

इंग्लंड आणि शारजाहमधून गोव्यात आलेल्या प्रवाशांपैकी 5 जण कोरोनाबाधित आढळले असून त्यांचे नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: देशात सर्वत्र पुन्हा एकदा कोरोनाचे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. हळूहळू परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आता सगळीकडे खबरदारी म्हणून कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. नुकतेच फ्रान्सने (France) सुद्धा देशात नवे कोविड (Covid) निर्बंध लागू केले आहेत. गोव्यातही नाईट कर्फ्यू लागू व्हावा,असा सल्ला तज्ज्ञ मंडळींनी दिला आहे.

मागील काही दिवसात गोव्यात पहिला ओमिक्रॉनचा (Omicron) रुग्ण आढळला आहे. राज्यात हळूहळू कोरोना बाधितांच्या संख्येत आपल्याला वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. इंग्लंडहून आलेल्या 181 प्रवाशांची कोरोना चाचणी (Corona Test) केली असता, त्यातील 4 जण कोरोनाबाधित आढळून आले. तर शारजाहमधून गोव्यात आलेल्या 49 प्रवाशांपैकी एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले. असे एकूण 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह असून पाचही जणांचे नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी ट्विटद्वारे दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT