Madgaon Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Madgaon Municipality : माफीनामा देत 15 नगरसेवकांकडून अविश्‍वास ठरावावर स्वाक्षऱ्या

मडगाव नगरपालिकेतील पराभवानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून आता वेगळे प्रयत्न सुरू झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Municipality : मडगाव नगरपालिकेतील पराभवानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून आता वेगळे प्रयत्न सुरू झालेत. नुतन नगराध्यक्ष घनःश्‍याम शिरोडकर यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणण्यासाठी पणजी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कार्यालयात काल शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली. यावेळी संबंधित नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली असून यापुढे अशी कृती होणार नाही, असे सांगत अविश्‍वास ठरावाच्या कागदपत्रांवर सह्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी मडगाव येथे बैठक घेतली होती. त्यावेळी मडगाव मॉडेल आणि भाजप यांचे एकूण 15 नगरसेवक हजर होते. सर्व नगरसेवकांनी आपण दामोदर शिरोडकर यांनाच मतदान करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानात फासे उलटे फिरले. काल भाजप उमेदवारांचा पराभव झाल्यावर त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली. यासाठी दिगंबर कामत यांनी 15 नगरसेवकांना घेऊन मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठले. मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे हेही हजर होते.यावेळी या ‘पाच’ नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागत यापुढे असे होणार नाही अशी हमी दिली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना कामत म्हणाले, ‘की कोणी विरोधात मतदान केले या न समजणाऱ्या गणिताने मुख्यमंत्री स्वतः हैराण झालेत. पालिका राजकारणात हे असे होतेच. घनःश्याम यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही,’ असेही त्यांनी सांगितले. तर ‘आमच्याच लोकांनी दगाफटका केला असा त्याचा अर्थ होत आहे. गद्दारी केलेल्यांनी नको असल्यास दुसरीकडे जावे, असे त्यांना सुचविण्यात आले आहे.

दोन दिवस आम्ही विश्रांती घेणार आहोत. पुढची कृती काय करायची ते आम्ही सोमवारी ठरवू’ अशी प्रतिक्रिया मंडळ अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी दिली.

जांबावली येथे शपथ?

मुख्यमंत्र्यांसोबत भेट घेतल्यानंतर कामत यांनी या सर्व नगरसेवकांना जांबावली येथे नेऊन देव दामोदरा पुढे प्रमाणित करून घेतले, अशी माहिती आहे. मात्र, या नगरसेवकांमध्ये महेश आमोणकर हे नव्हते असे सांगण्यात येते. ‘आम्ही भाजप उमेदवारांसोबत राहणार’, अशी शपथ त्यांना दिल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

नारळावर हात ठेवा म्‍हणताच..

एकाएकी दगा झाल्‍याने व्‍यथित झालेल्‍या दिगंबर कामत यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. ‘आम्‍ही विरोधात मतदान केले नाही हे तुम्‍ही नारळावर हात ठेवून सांगाल का?’, असा सवाल त्‍यांनी नगरसेवकांना केला. त्‍यावर काही नगरसेवक गडबडले. येथेही दिगंबर यांचा देव आला, अशीच काहीशी भावना त्‍यांची झाली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT