Digambar Kamat : दिगंबर कामतांना मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत जोरदार धक्का

दिगंबर कामत यांनी पुरस्कृत केलेला उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा अपक्ष घनःश्याम शिरोडकर यांनी 15 विरुद्ध 10 मतांनी पराभव केल्याने मडगाव पालिका कामतांच्या हातातून निसटली.
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

Digambar Kamat : दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसला ‘हात’ दाखवून भाजपत आलेल्या दिगंबर कामत यांना देवाने कौल दिलाच नव्हता की काय? अशी शंका आहे. मडगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कामत यांना जबरदस्त धक्का मिळाला. त्यांनी पुरस्कृत केलेला उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा अपक्ष घनःश्याम शिरोडकर यांनी 15 विरुद्ध 10 मतांनी पराभव केल्याने मडगाव पालिका कामतांच्या हातातून निसटली.

अपक्ष नगरसेवक घनःश्याम शिरोडकर हे आमदार विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्डच्या पाठिंब्यावर नगराध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी कामत यांचे उजवे हात गणले जाणारे दामोदर शिरोडकर यांचा पराभव केला. दामोदर निवडून यावे यासाठी निवडणुकीच्या आदल्या रात्री 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्री प्रमोद सावंत मडगाव येथील रेस्ट हाऊसमध्ये भाजप नगरसेवकांची मनधरणी केली होती. ‘ही गोवा फॉरवर्डची मडगाव मतदारसंघातील राजकारणाची सुरवात आहे. आता मडगाव फॉरवर्ड नेण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे,’ अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली. निवडणूक बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाले हे निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांना प्रभारी मुख्याधिकारी जयंत तारी यांनी सहाय्य केले.

पाच नगरसेवकांचे क्रॉस मतदान

भाजप आणि मॉडेल मडगाव यांचे एकूण 16 मते असताना दिगंबर कामतांच्या गटातील दामोदर शिरोडकर यांना अवघी दहाच मते मिळाली. भाजप नगरसेविका सुनिता पराडकर यांनी सुरवातीपासूनच घनःश्‍याम यांना जाहीर पाठिंबा दिला होता. उर्वरित भाजपच्या पाच नगरसेवकांनी क्रॉस मतदान करत गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांना साथ दिल्याचे स्पष्ट झाले.

Digambar Kamat
Goa Congress : सरकारचे नवीन जेटी धोरण सागरमालाचाच छुपा प्रकार

पालिकेतील घडामोडी

1) 2021 मध्ये भाजपला विरोध या मुद्द्यावर विजय सरदेसाईंच्या फातोर्डा फॉरवर्ड आणि कामत यांच्या मॉडेल मडगावने युतीमार्फत निवडणूक लढविली. सरदेसाई गटाचे 9 तर कामत गटाचे 8 नगरसेवक निवडून आले. भाजपचे सात नगरसेवक निवडून आले. पालिका या सरदेसाई - कामत या गटाकडे आली.

2) ज्यांचे नगरसेवक जास्त त्यांना आधी नगराध्यक्षपदाचा मान या तत्त्वानुसार पहिल्या 15 महिन्यांसाठी फॉरवर्डचे लिंडन परेरा हे नगराध्यक्ष झाले. तर कामत गटाच्या दीपाली सावळ या उपनगराध्यक्ष झाल्या. यावेळी आपल्याला नगराध्यक्ष होण्यापासून डावलल्याचा राग धरून घनःश्याम शिरोडकर कामत गटापासून दूर झाले.

3) विधानसभा निवडणुकीच्या वेळी श्‍वेता लोटलीकर या नगरसेविका फॉरवर्ड सोडून भाजपात सामील झाल्या. त्यामुळे भाजपची संख्या आठ झाली. नंतर अपक्ष असलेले महेश आमोणकर हेही भाजप पक्षात सामील झाल्याने त्यांची संख्या 9 पोहोचली.

4) ठरल्याप्रमाणे 15 महिन्यानंतर लिंडन परेरा यांनी राजीनामा देऊन नगराध्यक्षपद कामत गटासाठी खाली केले गेले. आपला गट कामत यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार अशी सरदेसाई यांनी घोषणा केली.

5) मात्र, नगराध्यक्ष निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर कामत यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने समीकरणे बदलली. सरदेसाई गटाने घनःश्याम शिरोडकर यांना पाठिंबा दिला.

6) नव्या समीकरणात मूळ भाजप आणि कामत गट यांच्या एकूण नगरसेवकांची संख्या 16 झाली. मात्र भाजपच्या सुनीता पराडकर या घनःश्याम शिरोडकर यांच्या बरोबर गेल्याने भाजपची एकूण संख्या 15 वर पोहोचली.

7) गुरुवारी रात्री या 15 नगरसेवकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आपण दामोदर शिरोडकर यांच्या बरोबर असल्याचे आश्वासन दिले. रात्री 11 वाजता ही बैठक संपली.

8) शुक्रवारी जेव्हा मतदान झाले तेव्हा मात्र दामोदर शिरोडकर याना 10 मतेच मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com