Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Arvind Kejriwal Arrest: गोवा निवडणुकीसाठी वापरले 45 कोटी रुपये; आपच्या उमेदवारानेही दिलाय आरोपांना दुजोरा

Arvind Kejriwal Arrest: दिल्ली मद्य घोटाळ्याचा गोव्याशी संबंध! हे पैसे 4 मार्गांनी गोव्यात पाठवण्यात आले.

Ganeshprasad Gogate

Arvind Kejriwal Arrest: सध्या देशात गाजत असलेल्या दिल्ली मद्य घोटाळ्याचा गोव्याशी संबंध आहे या आजवरच्या चर्चेवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वकीलांनी आज न्यायालयात मोहोर उमटवली.

सध्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयात रिमांड घेण्यासाठी सादर करण्यात आले, तेव्हा झालेल्या युक्तीवादावेळी ही माहिती ईडीच्या वकीलांनी न्यायालयात दिली.

ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे, की रोख रक्कम दोनदा हस्तांतरित करण्यात आली. आधी 10 कोटी आणि नंतर 15 कोटी रुपये देण्यात आले. केजरीवाल यांना पंजाब आणि गोवा निवडणुकीसाठी निधी हवा होता.

गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये वापरले गेले. ईडीच्या वकीलांनी न्यायालयाला सांगितले, की हवालाद्वारे 45 कोटी रुपये गोव्यात पाठवण्यात आले.

याची पुष्टी केवळ विधानाद्वारेच नाही, तर सीडीआरद्वारे देखील होते. आम्ही पैसे कुठे कसे गेले याचा तपास केला आहे. हे पैसे 4 मार्गांनी गोव्यात पाठवण्यात आले.

हे लोक नियमित संपर्कात होते. गोव्यातील आपच्या उमेदवारानेही या आरोपांना दुजोरा दिला आहे. या व्यक्तीला रोख रक्कमही देण्यात आली.

ईडीने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, केजरीवाल हे आप पक्षाचे प्रमुख आहेत. हे धोरण अरविंद, मनीष आणि संजय सिंह यांनी राबवले.

विजय हा केजरीवालांचा उजवा हात आहे. तो केजरीवालांसाठी किकबॅक गोळा करत असे. तो धोरण राबवायचा आणि न पटणाऱ्यांना धमकावत असे.

सरकारी साक्षीदार दिनेश अरोरा याने आपल्या जबानीत विजय नायरच्या सूचनेनुसार 31 कोटी रुपये दिल्याचे उघड केले. दक्षिण गटाकडून मिळालेले 45 कोटी रुपये आम आदमी पक्षाने 2021-22 गोव्यातील प्रचारात वापरले.

दिल्ली दारू धोरणात थेट सहभाग:-

दिल्ली दारू धोरण तयार करण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग असल्याचे ईडीने म्हटले आहे. काल गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली.

चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेल्यास अटक केली जाणार नाही, असे आश्वासन केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितले होते. केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहावे लागेल, त्यांच्या अटकेला स्थगिती नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दोन तास चौकशी:-

संध्याकाळी ७ वाजता, ईडीची टीम १० वे समन्स आणि सर्च वॉरंटसह केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. तपास यंत्रणेने अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी केली.

त्यानंतर रात्री ९ वाजता त्यांना अटक करण्यात आली. रात्री ११.०५ च्या सुमारास ईडीच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांना कारने ईडी कार्यालयात नेले. केजरीवाल यांना रात्री ११.५० वाजता ईडीच्या मुख्यालयात आणण्यात आले.

मध्यरात्र झाल्यानंतर आरएमएल रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक अरविंद केजरीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ईडी कार्यालयात पोहोचले. अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण रात्र ईडी कार्यालयात लॉकअपमध्ये काढली.

केजरीवाल यांनी समन्सना उत्तर:-

केजरीवाल यांच्यावतीने वकील विक्रम चौधरी म्हणाले - ऑक्टोबर २०२३ पासून समन्स जारी केले जाऊ लागले. कालपर्यंत सुमारे नऊ समन्स प्राप्त झाले होते.

केजरीवाल यांनी सर्व उत्तरे दिली. वकील अभिषेक मनु सिंघवी केजरीवाल यांच्याविरोधात कोणताही थेट पुरावा नाही. याला रिमांडचा आधार बनवू नये. यामध्ये लोकशाहीचे मोठे प्रश्न आहेत. शरद रेड्डी यांनी विजय नायर यांना पैसे दिले नसल्याचे म्हटले आहे.

हे विधान दोन वर्षांपूर्वी ९ सप्टेंबर २०२२ रोजी दिले होते. शरद रेड्डी केजरीवाल यांचे नाव घेत नसल्याने त्यांना अटकही करण्यात आली होती.

रिमांड तसाच मंजूर केला जात नाही. त्यासाठी न्यायालयाचे समाधान करावे लागते. ईडीने सिद्ध करावे की केजरीवाल यांना अटक करण्याची गरज का आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

SCROLL FOR NEXT