Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

चिखलीतील 44 बांधकामे अडचणीत

न्यायालयाने घरमालकांची याचिका फेटाळली

दैनिक गोमन्तक

पणजी: सुरक्षिततेच्या दृष्टीने दाबोळी विमानतळ फनेल क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे मानवी विचाराचा आधार घेऊन नियमित करण्यासाठी चिखली येथील 44 घरमालकांनी याचिका सादर केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही याचिका फेटाळताना ते शक्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

विमानतळाच्या फनेल क्षेत्रात असलेली बांधकामे धोकादायक असल्याच्या याचिकेत गोवा खंडपीठाने निवाडा देताना या क्षेत्रातील सर्व बांधकामे हटवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. फनेल क्षेत्रात कोणत्याही बांधकामांना परवानगी नसताना तेथे मोठमोठ्या इमारती तसेच अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याने अवमान याचिका सादर करण्यात आली होती. यावर खंडपीठाने दाबोळी येथील नौदल प्राधिकरणाची बाजू ऐकून घेतली होती. त्यांनी या क्षेत्रातील एकालाही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले होते.

दाबोळी विमानतळाच्या फनेल क्षेत्रात अळंबीप्रमाणे गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यातच गगनचुंबी इमारतींचीही बांधकामे उभी राहत असल्याने ते विमानांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे, अशी याचिका काही वर्षांपूर्वी गोवा खंडपीठात दाखल झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

Horoscope: दिवाळीच्या काळात राजयोगाची संधी, 'या' राशींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा; ग्रहांचा दुर्मिळ संयोग ठरणार फलदायी

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

SCROLL FOR NEXT