Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Cuncolim Shantadurga Kunkalikarin Issue: नमिता फातर्पेकर हिला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim Shantadurga Kunkalikarin Issue

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान तसेच या संस्थानाच्या समितीच्या विरोधात श्रेया धारगळकर आणि इतरांनी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करून रस्त्यावर उतरलेल्या सुमारे 400 भाविकांविरोधात कुंकळ्ळी पोलिसांनी हमरस्ता अडवून वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणातील अन्य एक संशयित नमिता फातर्पेकर हिला नोटीस देण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस शिपाई अस्मिता महाले हिला शिवीगाळ करून तिला चावल्याच्या आरोपाखाली मडगाव पोलीस स्थानकात आणखी एक गुन्हा नोंद केला आहे. सध्या फातर्पेकर हिला धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली आहे.

20 मे रोजी शेकडो भाविकांनी श्रेया धारगळकर आणि अन्य संशयितांना पोलिसांनी अटक करावी यासाठी बाळ्ळी येथे राष्ट्रीय हमरस्ता 66 अडवून ठेवला होता. सुमारे अडीच तास त्यामुळे वाहतूक बंद झाली होती.

आता या प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी सुमारे 400 अज्ञात भाविकांविरोधात भादंसंच्या 143 (दंगा माजविणे), 341 (अडवणूक करणे), 431 (सार्वजनिक रस्त्यावर अडवणूक करणे) यासह 149 (जमाव करुन दंगल माजविणे) तसेच राष्ट्रीय हमरस्ता कायद्याच्या कलम 8 (ब) खाली गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणी उपनिरीक्षक एस. वेळीप हे तपास करीत आहेत. महिला पोलीस शिपाई अस्मिता महाले यांना फातर्पेकर हिने शिविगाळ करून तिच्या हाताचा चावा घेतल्याच्या आरोपाखाली मडगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT