पणजी: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी 2019-2024 या कालावधीत 4 हजार (39.62) कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 3 हजार 619 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
दरम्यान, राज्यात या निधीतून मार्गी लावलेल्या 65 प्रकल्पांमुळे आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार असून राज्याच्या आर्थिक विकासालाही (Development) हातभार लागेल. प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ व वाहन संचलनाचा खर्च कमी होईल, तसेच रस्त्यांवरील सुरक्षाही वाढेल, असे मंत्री गडकरी यांनी उत्तरात म्हटले आहे.
गडकरी यांनी पुढे सांगितले की, काही प्रकल्पांमध्ये भूसंपादन, वाहतूक (Transportation) बदल व अन्य पूर्वतयारीतील अडचणींमुळे विलंब झाला आहे. मात्र या समस्या सोडवून प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पांमुळे आंतरराज्य, तसेच राज्यांतर्गत वाहतूक सुरळीत होण्यास व कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल, असा दावाही गडकरी यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.