Goa National Highway 66: प्रवाशांना गडकरींची भेट, 'या' पट्ट्यातील महामार्गाचे चौपदरीकरण, प्रकल्पाचा खर्च एक हजार कोटी

Union Ministry of Road and Transport: गोव्यातील बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या २२.१० किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी १,३७६ कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे
Union Ministry of Road and Transport: गोव्यातील बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या २२.१० किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी १,३७६ कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे
Goa National Highway 66Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa National Highway 66 Bendordem to Polem Canacona stretch 4 laning

पणजी : मुंबई- कन्याकुमारी महामार्गातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग- ६६ (NH 66) वरील २२ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे. गोव्यातील बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या २२.१० किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी १,३७६ कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे आणि हा नवीन मार्ग बेंदुर्डेला थेट कर्नाटकच्या सीमेशी जोडेल. या विस्तारामुळे सध्याच्या दोन पदरी रस्त्याचे चार पदरी महामार्गात रूपांतर होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल.

गेली दोन वर्षे सभापती डॉ. रमेश तवडकर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने चौपदरी रस्त्यासाठी पाठपुरावा करत होते.

Union Ministry of Road and Transport: गोव्यातील बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या २२.१० किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी १,३७६ कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे
Bhoma Road Widening : महामार्ग रुंदीकरणप्रश्नी स्पष्टीकरण द्या! भोमवासीयांची मागणी; नव्या पर्यावरणीय अहवालासाठी ग्रामस्थ आग्रही

यापूर्वी बेंदुर्डे ते चार रस्ता मनोहर पर्रीकर बगल चौपदरी रस्त्यापर्यंत जमीन संपादन करण्यासाठी ११२ सर्व्हे क्रमांकातील सुमारे २७.७७५ हेक्टर जमीन संपादन केली आहे.

बोगदा बनविणे अशक्य

हा रस्ता करमल घाटातून जातो. त्यामुळे काही झाडे कापावी लागणार आहेत. त्यामुळे हा रस्ता बोगदा खोदून करावा किंवा अन्य पर्याय शोधावा, अशी पर्यावरण प्रेमींची मागणी होती. मात्र, मृदा तपासणी केल्यानंतर येथे बोगदा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्याच्या हमरस्त्याला समांतर; पण आडवळणे कमी करून हा चौपदरी रस्ता करण्यात येणार आहे.

फायद कोणाला होणार?

NH 66 वरील बेंदुर्डे ते काणाकोण बायपास आणि काणकोण बायपास ते कर्नाटक सीमेवरील पोळेपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. काणकोण ते मडगाव हा मार्ग कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या अवजड वाहनांसाठीही महत्त्वाचा आहे. रुंदीकरणामुळे कर्नाटकासह महाराष्ट्रातील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com