38th National Games Dainik Gomantak
गोवा

38th National Games: उत्तराखंडमधील सात शहरांत 38व्या राष्ट्रीय स्पर्धा! यजमानपद स्वीकारले

साधनसुविधा निर्मितीत पर्यावरणपूरक क्रीडा आणि पर्यटन यांची सांगड

Kishor Petkar

38th National Games: उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा त्या राज्यातील एकूण सात शहरांत होणार आहे. स्पर्धेनिमित्त जागतिक दर्जाच्या साधनसुविधा निर्मितीत पर्यावरणपूरक क्रीडा व पर्यटन यांची सांगड घालण्याचे उद्दिष्ट तेथील सरकारने बाळगले आहे.

उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय स्पर्धा सचिवालयाने आयोजनासंदर्भात सविस्तर माहितीपुस्तिका प्रसिद्ध केली असून त्यात स्पर्धा आयोजनाचा सविस्तर नियोजन मांडण्यात आले आहे. गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची समाप्ती गुरुवारी झाली, त्यावेळी शानदार सोहळ्यात 38व्या स्पर्धेच्या यजमानपदाचा भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) ध्वज उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्य यांनी स्वीकारला. आता त्या राज्याकडे अधिकृत यजमानपद आले आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शन

उत्तराखंडमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाऊस नसतो, तसेच हवामानही अनुकूल असते, त्यामुळे 2024 मध्ये स्पर्धा घेण्याचे उत्तराखंड सरकारने ठरविले आहे. स्पर्धा आयोजनासंदर्भात गुरुवारी समारोप सोहळ्यापूर्वी उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्य यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अधिकृत भेट घेतली.

आर्या यांनी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे शानदार आयोजन केल्याबद्दल गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांना आपल्या राज्यातील स्पर्धेचे निमंत्रणही दिले. गोव्याने स्पर्धेची तयारी कशी केली याबाबत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आपण मार्गदर्शन घेतले, असे आर्य यांनी सोशल मीडियावर नमूद केले.

दोन ठिकाणी क्रीडानगरी

उत्तराखंडमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सचिवालयाच्या माहितीपुस्तिकेनुसार देहरादून, हल्दवानी, हरिद्वार, ऋषिकेश, रुद्रपूर, गुलरभोज, नैनिताल या सात शहरांत स्पर्धा होईल. त्यापैकी देहरादून व हल्दवानी या दोन शहरांत क्रीडानगरी असेल. या दोन्ही शहरांतील अंदाजे अंतर 280 किलोमीटर आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या नेतृत्वाखाली मागील जुलै महिन्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. गोव्यातील स्पर्धा आयोजन तयारीनिमित्त या समितीच्या शिष्टमंडळाने ऑगस्टमध्ये गोव्याचा दौराही केला होता.

34 खेळांव्यतिरिक्त पारंपरिक खेळही

ऑलिंपिक, आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिळून 34 खेळ उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत असतील. याशिवाय उच्चस्तरीय आयोजन समितीच्या पहिल्या बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी स्पर्धेत पारंपरिक देशी खेळांचा समावेश करण्याची सूचना केली होती. गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऑलिंपिक, आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील, तसेच देशातील पारंपरिक खेळ मिळून सर्वाधिक 43 खेळांचा समावेश होता.

उत्तराखंडला 25वा क्रमांक

गोव्यातील 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तराखंडला 25वा क्रमांक मिळाला. त्यांनी 3 सुवर्ण, 7 रौप्य व 14 ब्राँझसह एकूण 24 पदके प्राप्त केली. गोव्यात सर्वसाधारण विजेतेपद पटकावताना महाराष्ट्राने सर्वाधिक 228 पदके जिंकली.

यामध्ये 80 सुवर्ण, 69 रौप्य व 79 ब्राँझपदकांचा समावेश आहे. यजमान गोव्याने स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना नववा क्रमांक प्राप्त केला. त्यांनी 27 सुवर्ण, 27 रौप्य व 38 ब्राँझ मिळून एकूण 92 पदके जिंकली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT