Free Gas Cylinders in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 37,000 कुटुंबांना 3 गॅस सिलिंडर मिळणार मोफत

जून महिन्याच्या अखेरीपासून तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार : मंत्री गोविंद गावडे

Akash Umesh Khandke

मडगाव : दारिद्र्यरेषेखालील प्रवर्गातील सुमारे 37,000 कुटुंबांना जून महिन्याच्या अखेरीपासून तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत, अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन अलायन्स (UTAA) तर्फे बिरसा मुंडा यांच्या 122 व्या पुण्यतिथीनिमित्त मडगाव येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. गावडे म्हणाले की ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे.(Free Gas Cylinders in Goa)

"पहिल्या टप्प्यात जवळपास 37,000 बीपीएल कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नंतरच्या टप्प्यात त्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना योजनेखाली आणण्याची योजना सरकारने आखली आहे, गावडे म्हणाले.

येत्या एक-दोन दिवसांत ही योजना अधिसूचित करून महिनाअखेरीस ती लागू केली जाईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

Viral Video: माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून दिला चोप; नेपाळमधील भयावह व्हिडिओ पाहा

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

SCROLL FOR NEXT