पणसय मळ येथील अवैध चिरे खाणी बंद करा : पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर

प्रागैतिहासिक वारसास्थळाला धोका
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केपे : सांगे तालुक्यातील उसगाळी मळ गावात पणसय मळ येथे प्रागैतिहासिक प्रस्तर शिल्पांपासून अवघ्या 300 मीटर अंतरात बेकायदेशीर चिरे खाणी सुरू असल्याने त्या वारसास्थळाला धोका निर्माण झाला असून त्या खाणी त्वरित बंद कराव्यात,अशी मागणी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केली आहे.पणसयमळ येथे भेट देऊन त्यांनी पाहणी केली.

Goa Mining
एसजीपीडीए बाजारातील कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय

प्रस्तर शिल्पांना चिरेखाणी मुळे धोका निर्माण झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली, ही एक चांगली गोष्ट आहे. हे चिरे उत्खनन वन खाते,प्रदूषण नियंत्रण मंडळ, खाण खाते तसेच नगरनियोजन खात्याच्या परवानगीशिवाय तेही बागेसाठी राखीव असलेल्या जागेमध्ये सुरू असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याचे केरकर म्हणाले.

गोव्यातील वारसा स्थळांपैकी फक्त एकमेव वारसास्थळाची जागतिक स्तरावर निवड झाल्याने त्याची जपणूक करणे सरकारचे कर्तव्य असल्याचे केरकर यांनी सांगितले. या वरसास्थळा सर्व प्रकारची सुरक्षा देऊन याठिकाणी पर्यटकांना, इतिहासकारांना,पर्यावरण प्रेमींना येण्यास आकर्षित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

मंत्री फळदेसाई यांनी शिल्पांची जपणूक करावी

सदर प्रागैतिहासिक खडकांचे कोरीव काम सांगे मतदारसंघात असून सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई पुरातत्व खात्याचे मंत्री असल्याने त्यांना एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या खात्यांतर्गत या कोरीव कामांची जपणूक करण्यासाठी काम केले पाहिजे, असे केरकर यांनी सांगितले. या ऐतिहासिक कोरीव कामामुळे उसगाळी मळ जगभरात पोहचले,मात्र स्थानिक लोकांनीही या प्रस्तर शिल्पांना संरक्षण देण्याचे काम केले पाहिजे, असे केरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com