Goa Farming News Dainik Gomantak
गोवा

Goa Farming News: 3.5 कोटींचा बांध 4 महिन्‍यांत 2 वेळा फुटला

Goa Farming News: चोडण येथील प्रकार : शेतात घुसले खारे पाणी; कोट्यवधींचा खर्च खाजनात

दैनिक गोमन्तक

Goa Farming News: चोडण येथे सुमारे 3 कोटी 60 लाख रुपये खर्चून दुरुस्त केलेला खाजन शेतीचा बांध चार महिन्यांच्या काळात दोनवेळा फुटल्याने कामाच्‍या दर्जाबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. या बांधावर सरकारने खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया गेल्याचा आरोप शेतकरी व खाजन शेती कमिटीने केला आहे.

सरकारने या प्रकाराची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी कावा खाजन शेती संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत प्रियोळकर यांनी केली आहे. चोडण बेटावरील पश्‍चिम दिशेला असलेल्या या खाजन शेतीचा बांध दुरुस्‍त केल्‍यानंतर वीस दिवसांच्या आतच 4 जुलै रोजी त्‍यास भलेमोठे भगदाड पडून खारे पाणी शेतात घुसले.

तरीही शेतकऱ्यांनी जोखीम घेऊन पीक घेण्याचा प्रयत्‍न केला. आता तीन महिन्यांच्या आत काल पुन्हा एकदा या बांधाला मोठे भगदाड पडल्याने पाणी शेतात घुसले. त्‍यामुळे कावा खाजनशेतीची मोठी नुकसानी झाली. त्‍यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्‍याची मागणी प्रियोळकर यांनी केली आहे.

फुटलेल्या बांधातून मांडवी नदीतील खारे पाणी शेतात येऊन नंतर ते चोडण-पोंबुर्फा फेरीमार्गावर आले. त्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद ठेवावी लागली. प्रवाशांना त्‍याचा नाहक फटका सहन करावा लागला. दरम्‍यान, संबंधित कंत्राटदार राकेश याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्‍याने फोन उचलला नाही.

बांध फुटून शेतात खारे पाणी घुसल्‍यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारच्या अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लोकांना नाहक त्रास व नुकसानी सोसावी लागत आहे. पीडित शेतकऱ्यांना सरकारने विनाविलंब नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा.
- दिलीप पेडणेकर, शेतकरी
बांध दुरुस्तीचे काम जलस्रोत खात्यातर्फे कंत्राटदाराद्वारे करण्‍यात आले होते. त्‍याची पाहणी केली असता काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आले. त्‍याबाबत संबंधित खात्याचे अभियंते, तिसवाडी मामलेदार व स्‍थानिक आमदाराला संघटनेने पत्र लिहिले. पण त्‍याकडे दुर्लक्षच झाले.
- श्रीकांत प्रियोळकर, कावा खाजन शेती संघटनेचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT