Goa Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: गोव्यात तीन दिवसांत 5 मृत्युमुखी, दीड महिन्यात 35 अपघात बळी

Goa Accident Death: पोरस्कडेत दुचाकीस्वार ठार; राज्यात तीन दिवसांत पाच मृत्युमुखी

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death:

राज्यात गेल्या तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातांमध्ये पाचजणांचा बळी गेला असून त्यातील चौघेजण विशीतील तरुण आहेत. आज पोरस्कडे येथे झालेल्या अपघातात एका प्रौढाचा मृत्यू झाल्याने एकूण पाचजणांचा अपघातांमध्ये अंत झाला.

राज्यात नव्या वर्षात (२०२४) आतापर्यंत ३५ जणांचे रस्ते अपघातांमध्ये बळी गेले आहेत. १ ते ३१ जानेवारीपर्यंत २०, तर १८ फेब्रुवारीपर्यंत १५ जणांचा अपघातांत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका बाजूने राज्य सरकार अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असले, तरी दुसऱ्या बाजूने अपघातांची आणि त्यातील बळींची संख्या वाढतच चालली आहे. यासाठी वेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणा यासारखे घटक कारणीभूत ठरत आहेत.

शुक्रवारी चांदर येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांचा बळी गेला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारला धारेवर धरले असून रस्ते अपघात रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. चांदर येथील अपघातात मृत पावलेल्या तन्वेश नाईक या तरुणाच्या काकाच्या मालकीच्या ट्रकची धडक त्या दोघांच्या दुचाकीला बसली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी आरोंदेकरवाडा- हरमल येथे दोघा चुलत बंधूंचा अपघातात अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या मृत्युनंतर प्रक्षुब्ध झालेल्या ग्रामस्थांनी या अपघातास कारणीभूत असलेल्या दोन्ही वाहनचालकांना आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी केली होती. त्यातच आज (रविवारी) पोरस्कडे येथे एका कारने ठोकरल्याने एका दुचाकीस्वाराचा बळी गेला. त्यामुळे आणखी एक संसार उघड्यावर पडला आहे.

‘त्या’ दोन चालकांना अटक

हरमल येथील अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार व ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांना अटक करण्याची मागणी युवकांनी बराच वेळ लावून धरली. पेडणे व मांद्रे पोलिस स्थानकावर जेव्हा लोकांचा दबाव वाढला, तेव्हा पोलिसांना कारवाई करणे भाग पडले. या दोन्ही चालकांना अटक केली आहे. युवकांनी एफआयआर कॉपी देण्याचा आग्रह धरल्यानंतर शनिवारी रात्री १२ वाजता प्रत दिल्याचे सांगण्यात आले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे दीपक कळंगुटकर हे कार्यकर्त्यांसमवेत शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकात उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT