Airlines Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: खूशखबर! कझाकिस्तानमधून दाबोळीला उतरणार ३२ चार्टर विमाने; उद्योजकांसाठी दिलासा

Kazakhstan Charter Flights: हिवाळी मोसमात कझाकिस्तानमधून दाबोळीला एकूण ३२ चार्टर विमाने उतरणार आहेत. ही विमाने ‘फ्‍लाय एरिस्‍तान’ या कझाक एअरलाईन्‍सद्वारे गोव्‍यात आणली जाणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Kazakhstan Charter Flights At Dabolim Airport

मडगाव: माेपा विमानतळ सुरू झाल्‍यामुळे दक्षिण गोव्‍यात येणारे विदेशी पर्यटक कमी झाले आहेत. त्‍यामुळे दक्षिण गोव्‍यातील आदरातिथ्‍य व्‍यावसायिकांमध्‍ये काहीसे चिंतेचे वातावरण पसरलेले असतानाच यंदाचा हिवाळा या व्‍यावसायिकांना खूषखबर घेऊन येणारा आहे. या हिवाळी मोसमात कझाकिस्तानमधून दाबोळीला एकूण ३२ चार्टर विमाने उतरणार आहेत. ही विमाने ‘फ्‍लाय एरिस्‍तान’ या कझाक एअरलाईन्‍सद्वारे गोव्‍यात अाणली जाणार असून रशियाच्‍या अझूर एअर आणि स्‍कॅट एअरलाईन्‍स या दोन विमान कंपन्‍यांंनंतर दाबोळीला चार्टर विमाने उतरविणारी फ्‍लाय एरिस्‍तान ही तिसरी विमान कंपनी ठरणार आहे.

मागच्‍या सोमवारी या विमान कंपनीचे १६५ पर्यटकांना कझाकिस्तानची राजधानी अस्‍थाना येथून घेऊन आलेले विमान दाबोळीला उतरले होते. सध्‍या गोव्‍यातून कझाकिस्तानच्‍या दोन शहरांमध्‍ये थेट विमानसेवा सुरू झाल्‍याने या देशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर गोव्‍यात येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. या घडामाेडीवर भारतीय विमान प्राधिकरणानेही समाधान व्‍यक्‍त केले आहे. यंदा तीन कंपन्‍यांची चार्टर विमाने दाबोळीला उतरणे ही आमच्‍यासाठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया प्राधिकरणाच्‍या प्रतिनिधींनी व्‍यक्‍त केली.

पर्यटन उद्योजकांसाठी दिलासा

रशियानंतर गोव्‍याला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्‍ये कझाकिस्तानच्‍या पर्यटकांचा समावेश होतो. हे पर्यटक उत्तर गोव्‍यातील गजबजलेल्‍या समुद्रकिनाऱ्यांऐवजी दक्षिण गाेव्‍यातील शांत अशा समुद्रकिनाऱ्याला भेट देणे पसंत करतात. कझाकिस्तानच्‍या तीन शहरांतून सध्‍या पर्यटकांना गोव्‍यात आणले जात असून त्‍यातील आझूर एअर ही रशियन चार्टर कंपनी हुनूकोवो या विमानतळावरून तर स्‍कॅट एअरलाईन्‍स ही चार्टर विमान कंपनी कझाकिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्‍या अलमाटी येथून गोव्‍यात पर्यटकांना घेऊन येत आहे. दक्षिण गोव्‍यातील पर्यटन उद्योजकांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील उद्याेजक क्रूझ कार्दोज यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT