Goa Tourism: विदेशी पर्यटकांना भावतोय गोवा; नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आनंदवार्ता

Foreign Tourist in Goa: गोव्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या उत्तरावरून माहिती समोर
Foreign Tourist in Goa: गोव्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या उत्तरावरून माहिती समोर
Murlidhar Mohol on Foreign Tourist in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यासाठी पर्यटन अत्यंत महत्वाचं आहे, आणि पर्यटनामधून येणाऱ्या महसुलात घट झाल्यास गोव्यासाठी धोक्याची घंटा निर्माण झाली असं म्हणावं लागेल. गोव्यात वर्षभरात देशी आणि विदेशी पर्यटक भेट देत असतात आणि आनंदाची बाब म्हणजे यंदाच्या वर्षी गोव्यात येणाऱ्या देशी प्रमाणेच विदेशी पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. गोव्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या उत्तरावरून ही माहिती समोर आली.

कोरोनानंतर वर्ष २०२२ पर्यंत राज्यात पर्यटकांच्या संख्येत घट झाली होती, मात्र २०२३ पासून गोव्यातील पर्यटनाची स्थिती बदलायला सुरुवात झाली आहे . वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण ४,६७,४१० विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली.

Foreign Tourist in Goa: गोव्याचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या उत्तरावरून माहिती समोर
Goa Tourism: पुन्हा उफाळला गोवा पर्यटनाचा वाद; गोव्याची 'दिल्ली' केल्याने ऱ्हास, उद्योजक तरुणी भडकली

हाच आकडा वर्ष २०२३-२४ मध्ये ५,४२,३७७ वर जाऊन पोहोचला. दाबोळी विमानतळावरून ४,२७,०८९, तर मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १,१५,२८८ पर्यटकांनी गोव्यातला भेट दिली होती अशी माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे गोव्यातील पर्यटनाला जबरदस्त फटका बसला होता आणि यामुळे गोव्यातील पर्यटनावर आधारित व्यवहारांना नुकसान सोसावे लागले मात्र त्यानंतर हळूहळू परिस्थती सुधारायला सुरुवात झाली आहे. पर्यटकांचा आकडा पहिला तर विदेशी पर्यटकांना गोव्याची ओढ पाहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com