Lokotsav 2023: लोकोत्सवात पारंपरिक वस्तू तसेच कंदमुळे विक्रीस उपलब्ध करून सुमारे तीनशे स्वंय सहाय्य गटांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला स्वंय सहाय्य गटांनी या लोकोत्सवात आपला सहभाग दिला आहे.
त्यामध्ये काटे कणंगा, झाड कणंगा, अळू माडी, कारांदे, त्रिफळ,खोला मिरची, शाकेची केळी व अन्य वस्तू विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. मोरपिसेही विक्रीस उपलब्ध होती. शहरी भागातून लोकोत्सवास आलेल्या नागरिकांनी या ग्रामीण पारंपरिक वस्तूंवर अक्षरशः उडी टाकली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटनाच्या भाषणात या पारंपरिक वस्तू खरेदी करताना किंमतीच्या बाबतीत कोणतीच घासाघीस न करता खरेदी करावी,असे आवाहन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.