Water Crisis Solution In Mandrem Dainik Gomantak
गोवा

Mandrem: मांद्रेतील रस्ते ठरणार धोकादायक!जलवाहिन्यांसाठी ठिक-ठिकाणी खोदकाम; डिसेंबरपर्यंत पाणी प्रकल्प होणार पूर्ण

Water Crisis Solution In Mandrem: मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ३० एमएलडी प्रकल्प तुये येथील आयटीआयजवळ उभारला जात आहे. हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आहे. त्यासाठी सध्या जलवाहिन्यांचे जाळे विणले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ३० एमएलडी प्रकल्प तुये येथील आयटीआयजवळ उभारला जात आहे. हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आहे. त्यासाठी सध्या जलवाहिन्यांचे जाळे विणले जात आहे. मात्र यासाठी रस्त्याच्या बाजूने केलेले खोदकाम या पावसाळ्यात पुन्हा अडचणीचे ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत.

गेल्याच वर्षी रस्त्याच्या एका बाजूने भूमिगत वीज केबल घातलेले रस्ते व्यवस्थित बुजविले गेले नाहीत वा डांबरीकरणही केले गेले नाहीत. नोव्हेंबरपासून तुयेतील आयटीआय ते पार्से हॉस्पिटलपर्यंत दुसऱ्या बाजूने रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्यात येत आहे,

मात्र जलवाहिनी घातल्यानंतर चर व्यवस्थित बुजविले गेले नाहीत. आता पार्सेचे माजी सरपंच अजित मोरजकर यांच्या निवासस्थानापासून रस्ते खोदण्यास सुरवात झाली आहे. चोपडे आगरवाडापर्यंत हे खोदकाम होणार आहे. तोवर पावसाळा लागणार असल्याने या रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतरच करावे लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात खोदकाम केलेल्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार असल्याने वाहनचालक चिंता व्यक्त करीत आहेत. मागील पावसाळ्यातही रस्त्यांवरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

खोदलेल्या रस्त्यांवर डांबराचे आवरण घालणार : आरोलकर

आमदार जीत आरोलकर यांच्याकडे संपर्क साधला असता, मांद्रे (Mandrem) मतदारसंघातील पुरवठा व्यवस्था सुधारण्यात येत आहे, तुयेत ८० कोटींपेक्षा जास्त खर्च करून पाणी प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होईल. पण त्याआधी जलवाहिन्यांचे जाळे विणणे आवश्‍यक आहे, त्यानुसार हे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात हे रस्ते धोकादायक बनू नये, यासाठी या रस्त्यांवर डांबराचे आवरण घातले जाईल. तसेच दिवाळीनंतर हॉटमिक्स डांबरीकरण केले जाईल. असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT