Mandrem: मांद्रेतील जनतेला इव्हेंट नको, नोकऱ्या द्या! लोकांची थट्टा न करता सरकारने जबाबदारी घ्यावी; पार्सेकरांनी मांडले स्पष्ट मत

Laxmikant Parsekar: रस्त्यासाठीचे भूसंपादन आठ वर्षे रखडले. त्यासाठी आता प्रक्रिया सुरू केल्याचे सांगून जनतेची थट्टा न करता सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.
Laxmikant Parsekar
Laxmikant Parsekar Dainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: मांद्रे मतदारसंघातील नियोजित मोपा विमानतळ प्रकल्प मार्गी लागला, महसूल प्राप्ती सुरू झाली. मात्र, तुये इस्पितळ, वीज उपकेंद्र, तेरेखोल पूल, इलेक्ट्रॉनिक सिटी आदींद्वारे हजारो रोजगार व नोकऱ्यांची उपलब्धी झाली असती.

मांद्रेतील जनतेने कार्निव्हल, शिमगोत्सव इव्हेट मागितले नाहीत, त्यांना नोकऱ्यांची गरज आहे. स्वच्छ निसर्ग, पर्यावरण, पोलिसांची व गुंडांची दादागिरी नको तसेच ‘कमिशन राज’ होऊ नये, अशी अपेक्षा आहे, असे मत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

तुये इस्पितळ ज्या उदात्त हेतूने व निरपेक्ष भावनेने डिझाईन केले, त्यात तसूभरही बदल स्वीकारता येणार नाही. पेडणे तालुका हा पूर्वीचा तालुका नसून, रेल, रोड व एअर या तिन्ही बाजूंनी परिपक्व आहे. लोकसंख्या वाढल्याने निश्चितच तीन मतदारसंघ होईल व सर्व खुले असतील. वीज, पाणी व रस्ते सुविधा नसल्यास चांगल्या कंपन्या येणे कठीण आहे. तुये इस्पितळ १०० खाटांचे व गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे इस्पितळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Laxmikant Parsekar
Goa News: गोव्यात रस्त्याकडेला, समुद्रकिनाऱ्यावर जेवण करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई! दंडाची तरतूद, स्टोव्ह- गॅस होणार जप्त

विमानतळ प्रशिक्षक केंद्राची स्थापना न झाल्याने रोजगार संधी हुकल्या याचा खेद आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. तुयेत वीज, पाणी प्रकल्पासाठी दहा हजार चौरस मीटर जागा ताब्यात घेतली, रूपांतरण केले. मात्र, काम सुरू झालेले नाही. रस्त्यासाठीचे भूसंपादन आठ वर्षे रखडले. त्यासाठी आता प्रक्रिया सुरू केल्याचे सांगून जनतेची थट्टा न करता सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.

Laxmikant Parsekar
Goa News: कदंब नौदल तळावर भारतीय नौदलाच्या‘आयओएस सागर’ मोहिमेचा शुभारंभ

‘आरोलकरांनी हुशारी विकासासाठी वापरावी’

मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी एकदा आपली भेट घेतली होती व माहिती मागितली होती. राजकारणात ते नवीन असल्याने आपण माहिती दिली. मात्र, त्यानंतर ते कधीच आले नाहीत. आपल्यापेक्षा ते नक्कीच हुशार आहेत. मात्र, एखाद्या प्रकल्पाची खोलात जाऊन माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांनी आपली हुशारी तुये इस्पितळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, तेरेखोल पूल आदी कामासाठी वापरावी, असे पार्सेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com