Mandrem: मांद्रेतील पुरुष मंडळींचा ग्रामदैवताच्या साक्षीनं सार्वजनिक गुढीपूजनाचा संकल्प, महिलांचाही असणार सहभाग

Mandrem Gudi Padwa Celebration: गुढीपूजनात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत.
Mandrem
MandremDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मांद्रे गावातील पुरुष मंडळींनी एकत्रित येऊन नववर्षाच्या प्रारंभी एकत्रितपणे मांद्रेचे ग्रामदैवत असलेल्या श्री सप्तेश्वर भगवती देवस्थानच्या प्रांगणात सार्वजनिक गुढी उभारण्याचा संकल्प केला आहे.

हा संकल्प तडीस लावण्यासाठी गेले दोन महिने ‘मांद्रे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समिती’तर्फे गावात जनजागृती सुरू आहे.

या गुढीपूजनात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत. रविवार, ३० मार्च रोजी पहाटे श्री भगवती सप्तेश्वर देवस्थानच्या प्रांगणात होणाऱ्या या गुढीपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रामुख्याने महिला घरोघरी संपर्क साधून ‘गुढी संस्काराची गुढी संस्कृतीची’ या बोधवाक्याचा जयघोष करीत आहेत. गुढी उभारणीचे हिंदू धर्मातील महत्त्व सर्वांना पटवून देत आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Mandrem village, public Gudi Padwa, Gudi installation, Shri Sapteshwar Bhagwati temple, Goa festival traditions, Mandrem cultural event, Hindu New Year, Goa religious celebrations, temple rituals, community festival, traditional customs, Gudi Padwa 2025, Goan heritage, village unity, festival spirit

या पत्रकार परिषदेला मांद्रे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समितीचे अध्यक्ष मुकुंद कायसूवकर, महिला उपप्रमुख तन्वी केरकर, दीपा हडफडकर, रूपा सातोसकर, राधा कवठणकर, रिया गोसावी, सुहाना हणजूणकर, सपना बागकर, सेजल गावडे, नीलम पार्सेकर यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गुढी पूजनानंतर पाडव्याची मांद्रे गावात मिरवणूक काढली जाईल. श्री भगवती सप्तेश्वर मंदिराकडून या मिरवणुकीला प्रारंभ होईल. त्यानंतर मधलामाज, आश्वे, जुनसवाडा, म्हाळसा मंदिर मधलामाज बाजार, मराठवाडा, दांडोसवाडा, गावडेवाडा, सावंतवाडा, सच्चे भाटले, साळगावकरवाडा, नाईकवाडा, आस्कावाडा अशी परिक्रमा पूर्ण करून श्री भगवती सप्तेश्वरच्या प्रांगणात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता होईल.

Mandrem
Goa Politics: बाह्य जाहिरात विधेयक निवड समितीकडे, आमदार फेरेरा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारचा निर्णय

या वेळी श्री सप्तेश्वर भगवती मंदिराच्या प्रांगणात उभारल्या जाणाऱ्या या गुढीपूजन स्थळी रांगोळी घालताना महिलांनी सहभागी व्हावे. तसेच गुढीपूजनाच्या या उत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांनी काठपदराची साडी किंवा नऊवारी साडी परिधान करावी. त्यातून हिंदू संस्कृतीचे आपोआप दर्शन होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

संस्कृतीचे जतन गरजेचे

मांद्रे नववर्ष समितीच्या गुढीपाडवा स्वागत समितीच्या महिला प्रमुख शिल्पा म्हामल म्हणाल्या, नवीन वर्षाचे स्वागत म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन आहे. संस्कृतीची जाणीव नवीन पिढीला व्हावी आणि त्यातून संस्काराचे बीज सर्वत्र पसरावे स्वतःच्या संस्कृतीशी त्यांची नाळ जुळून यावी यासाठी अशा कार्यक्रमांची आज गरज आहे. या विचाराने घरोघरी होणाऱ्या गुढीपूजनानंतर सार्वजनिक गुढी उभारण्याचा संकल्प इथल्या लोकांनी केला आहे. त्यात आम्ही महिला एकत्रितपणे सहभागी झालो आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com