Ashtami Feri in Panjim Dainik Gomantak
गोवा

Panjim News : अष्टमीच्या फेरीतून 30 लाखांचा महसूल!

400 दुकाने : मात्र अर्जांच्या काळ्या बाजारामुळे महापालिकेची नामुष्की

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim News : गणेशोत्सवात मांडवी किनारी भरवल्या जाणाऱ्या अष्टमीच्या फेरीतून महापालिकेच्या तिजोरीत 30 लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांनी दिली. यंदा अष्टमी फेरीच्या नियोजनाचा बोजवारा उडाला होता. अर्जांच्या काळ्या बाजारामुळे महापालिकेचे नाव पुरते बदनाम झाले होते. गणेश चतुर्थीला दोन दिवस बाकी असताना अर्जांची विक्री करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले.

ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती, त्यांच्याकडून काही लोकांनी अर्ज घेऊन त्यांच्या झेरॉक्स काढून त्यांची अव्वाच्या सव्वा रुपयांना विक्री केली होती. विशेष म्हणजे या काळात 15 हजार रुपयांना काहीजणांनी अर्ज काळ्या बाजाराने घेतले होते. ही बाब प्रसार माध्यमांमध्ये पोहोचल्याने अखेर आमदार बाबूश मोन्सेरात यांना त्यात लक्ष घालावे लागले. त्यांनी महापालिकेत येऊन अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर तत्काळ महापालिकेची सूत्रे हलली आणि अर्ज वेगळ्या रंगात छापून घेऊन त्या प्रक्रियेत बदल केला. त्यामुळे चारशेच्यावर दुकानांना फेरीत परवानगी मिळाली.

आयुक्त, अभियंत्यांचे कौशल्य

यंदा फेरीबोटीजवळील क्रूसपासून ते कला अकादमीच्या आऊट गेटपर्यंत व्यावसायिकांनी दुकाने थाटली. बारा दिवस राहिलेल्या या फेरीमुळे भाड्यापोटी महापालिकेला 30 लाखांवर महसूल मिळाला असल्याचे लेखापाल सिद्धेश देसाई यांनी सांगितले. कमी वेळेत आयुक्त फर्नांडिस, अभियंते विवेक पार्सेकर यांनी केलेल्या नियोजनामुळे पुन्हा व्यावसायिकांचा गोंधळ उडाला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाक लष्करप्रमुखाची आंतरराष्ट्रीय फजिती! असीम मुनीरला सुरक्षा रक्षकानं गेटवरच केलं 'क्लीन बोल्ड'; काय घडलं नेमकं?

एक 'क्लिक' करताच दीड लाख गायब! सायबर चोरट्यानं चिखलीतील ज्येष्ठ नागरिकाला लुटलं; क्रेडिट कार्डचं डिटेल्स देणं पडलं महागात

Bicholim Shop Fire: लॅपटॉप, संगणक अन् मशीन जळून राख; डिचोलीत ग्राफिक्सच्या दुकानाला भीषण आग, 'इतक्या' लाखांचे नुकसान

India vs Pakistan: 'अल्ला पाऊस पाड, 1 गुण मिळेल', पाकिस्तानी खेळाडूची देवाकडे प्रार्थना! मैदानात भिडण्यापूर्वीच पाकड्यांनी मानली हार

"व्हॅलेंटाइनवेळी गोव्याचे किनारे असे काही गजबजतात की, पाऊल ठेवायला जागा उरत नाही; प्रेमाचा बाजार आणि साहित्याचा ठणठण गोपाळ

SCROLL FOR NEXT