Whale found on Talpona beach, Goa Dainik Gomantak
गोवा

Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

Whale Fish Death: व्हेल माशाचा मृतदेह लाटांच्या जोराने किनाऱ्यावर येऊन धडकला असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांतर्फे वर्तविण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध तळपण समुद्रकिनाऱ्यावर रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास पर्यटक व स्थानिक नागरिकांनी एक दुर्मीळ दृश्य पाहून लगेच जीवरक्षकांना बोलावून घेतले आणि जीवरक्षकांनी वन खात्यातील अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. हे दुर्मीळ दृश्य म्हणजे व्हेल माशाचा मृतदेह होता.

सुमारे २५ ते ३० फूट लांबीचा अर्धवट कुजलेला व्हेल माशाचा मृतदेह लाटांच्या जोराने किनाऱ्यावर येऊन धडकला असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांतर्फे वर्तविण्यात आला.

दृष्टी मरीनचे जीवरक्षक या घटनेला सर्वप्रथम सामोरे गेले. समुद्रकिनाऱ्यांवरील जीवजंतू अथवा सागरी प्रजातींच्या मृतदेहासंबंधी ठरवलेल्या आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली.

वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृत व्हेलची तपासणी करून प्राथमिक अहवाल तयार केला व त्यानंतर, सुरक्षा कारणास्तव पर्यटकांना त्या भागापासून दूर ठेवण्यात आले.

दृष्टी मरीनच्या कर्मचाऱ्यांनीही अधिकाऱ्यांना मदत करून मृतदेह सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याची (पुरण्याची) प्रक्रिया पूर्ण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Election: रोहन गटाचा 'त्रिफळा'; चेतन-बाळूचा विजयी 'षटकार'; परिवर्तन गटाचा 6-0 फरकानं उडाला धुव्वा, पाटणेकरांचाही पराभव

'ओंकार' परतून गोंयात आयलो रे..! फकीर पाटो येथे केळीच्या बागेचे केले नुकसान; कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी

Goa Tourism: पर्यटन मंत्री खंवटे म्हणतात, 'टॅक्सी व्यावसायिकांना माफिया म्हणू नका'; गोवा आणि 'व्हिएतनाम'मधील पर्यटनाचा फरकही केला स्पष्ट

'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

SCROLL FOR NEXT