Barge Sank: समुद्रात असलेल्या जहाजाच्या अवशेषांनी घात केला; मुरगावात लोखंडी प्लेट्सने भरलेल्या बार्जला जलसमाधी, 8 खलाशी बचावले

Barge Sank At Mormugao Port Vasco Goa: बार्ज बंदरात उभ्या असलेल्या जहाजाकडे लोखंडी पेल्लेट्स पोहोचविण्यास जात असताना यापूर्वी पाण्याखाली बुडालेल्या जहाजाच्या अवशेषाला ती धडकली.
Barge sinks in Goa | Mormugao Port
A loaded barge sank in the Zuari River near MormugaoDainik Gomantak
Published on
Updated on

Barge Sank At Mormugao Port Vasco Goa

वास्को: मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या (MPA) हद्दीत दोन दिवसांपूर्वी लोखंडी पेल्लेट्स वाहून नेणारी बार्ज बुडाली. सुदैवाने बार्जवरील आठही खलाशांना वाचविण्यात यश आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बार्ज बंदरात उभ्या असलेल्या जहाजाकडे लोखंडी पेल्लेट्स पोहोचविण्यास जात असताना यापूर्वी पाण्याखाली बुडालेल्या जहाजाच्या अवशेषाला ती धडकली. या धडकेमुळे बार्जच्या तळाला भेग पडली आणि त्यातून आतमध्ये भराभर पाणी शिरले. मात्र, खलाशांना तातडीने वाचविण्यात आले.

Barge sinks in Goa | Mormugao Port
...अन्यथा मनोहर पर्रीकरांना खोटारडे ठरवा; मंत्री माविन यांच्याविरोधात गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार का? चोडणकरांचा सवाल

बार्ज काढण्याचे प्रयत्न असफल

धडक झाल्यानंतर ही बार्ज जहाजाच्या अवशेषातच अडकून राहिली. बार्जमालकाने फ्लोटिंग क्रेनच्या साहाय्याने ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु जोरदार वारा आणि समुद्र खवळलेला असल्याने ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. बार्ज अद्यापही जहाजाच्या अवशेषातच अडकली असून ती हटविण्यास आणखी काही दिवस लागू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

Barge sinks in Goa | Mormugao Port
UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

मासेमारी नौकांसाठी डोकेदुखी

एमपीए हद्दीत पाण्याखाली जुन्या जहाजांचे अवशेष अजूनही असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. काही वर्षापूर्वी येथे दोन मोठी जहाजे बुडाली होती. त्यापैकी एका जहाजाचे अवशेष एमपीएने हटविले असले तरी दुसऱ्या जहाजाचे अवशेष अद्यापही तेथे आहेत.

हे अवशेष अनेक वर्षांपासून बार्ज, मासेमारी नौका व छोट्या बोर्टीसाठी अपघातास कारणीभूत ठरत आहेत," असे सूत्रांनी नमूद केले. स्थानिकांनी या धोकादायक अवशेषांचे तातडीने निर्मूलन करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com