Farmer Prasad Naik giving information about agriculture Dainik Gomantak
गोवा

Success Story : अनेक भाज्यांच्या उत्पादनाचा प्रयोग; 30 शेतकरी एकवटले

कुंभारजुवेत मुळा, मिरची, वाल, कांदा, मोहरी, लालभाजीसह मकाही बहरला

Sanjay Ghugretkar

Success Story : अनेक गावात पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष होत असूनही दिलासादायकबाब म्हणजे कुंभारजुवेसारख्या बेटावर पारंपरिक पद्धतीने अखंडितपणे पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळ्यातही शेती केली जाते.

यंदा येथील ‘चुनेकातर’ शेतात मुळा, मिरची, वाल, कांदा, चिटकी, लालभाजी, नवलकोल, मोहरी, कोंथिबीर, मका, अळसांदे, झेंडू फुले, वांगीसारखी पिके बहरलेली असून परिसरात दररोज ताजी भाजी उपलब्ध होत आहे.

माशेल-कुंभारजुवे पंचक्रोशीत ‘चुनेकातर’ शेतातील भाजी सकाळ-संध्याकाळी विकली जाते. अनेकजण गवंडाळी पुलाजवळच्या शेतातही भाजीसाठी जातात. शिवाय बगलमार्गावरही ही भाजी विकली जाते. तसेच पुढील वर्षासाठी बि-बियाणेही जतन करून ठेवली जातात. फेब्रुवारीत लाल भाजीचे बियाणे या भागात उपलब्ध आहे.

विद्युत `पंपा`चा वापर

पूर्वी हिवाळा, उन्हाळ्यातील शेतीला पाणी पुरवठा हा छोट्या विहिरी, खड्यातून पाणी स्वतः हाताने काढून रोपांना दिले जात होता. ते कष्टदायक काम होते. अजूनही काहीप्रमाणात ते केले जाते, पण बहुतांश शेतकऱ्यांनी अलीकडे विद्युत पंपाची सोय केल्याने सकाळ-संध्याकाळ पाणी देणे सोयीचे झाले आहे.

बगलमार्गासाठी शेतीवर संक्रांत

गवंडाळी पूल आणि बगलमार्गासाठी ‘चुनेकातर’ची शेती गेली, पण नुकसान भरपाई योग्य मिळाली नाही. शिवाय कुंभारजुवेसाठी या बगलमार्गाचा लाभही काही झाला नाही. वेगळा रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप रस्ता नाहीच.

शेतकीवर संक्रांत आली, शेती गेली. या जमिनीची रक्कम फक्त ८ रुपये स्क्वे.मी. दराने दिली गेली, ती योग्य नसल्याने काहींनी घेतलीही नाही. अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशी नाराजीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

‘कातर’ म्हणजे काय रे भाऊ?

नदी किनाऱ्याजवळच्या भागाला ‘कातर’ असे म्हणतात, कदाचित या भागात पूर्वी चुनखडीचा अंश सापडला असेल. त्यामुळेच या भागात ‘चुनेकातर’ असे म्हटले असावे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक मधू गावकर यांनी दिली.

नदी किनाऱ्याजवळच्या शेतीला `दंडा`वरील शेती म्हणतात. दलदल, पातळ शेतीला `माजण` म्हणतात. त्या ठिकाणी पाण्याचा अंश अधिक असतो, अशा ठिकाणी हिवाळ्यात, उन्हाळ्यात चांगली पिके येतात.

जानेवारी-मेपर्यंत उत्पन्न

जानेवारीपासून शेती सुरू होते. लालभाजी, मूळा ही पिके लवकर येतात. याच काळात मिरची, मका, वाल इतर पिकांची लावणी, पेरणी केली जाते. भाजी किमान मे महिन्यापर्यंत उपलब्ध असते.

त्यानंतर पावसाळ्यात पुन्हा भात शेती केली जाते. येथील शेतकरी जिद्दी आणि कष्ट करणारे आहेत. त्यामुळे शेती पडीक न ठेवता अखंडितपणे वेगवेगळी पिके घेतली जातात. शासनाचे अनुदान नसताना शेती शेतकरी पिकवतात, ही आजच्या काळात कौतुकस्पद बाब आहे, अशी माहिती ‘चुनेकातर टेनंट असोसिएशन’चे चेअरमन प्रसाद नाईक यांनी दिली.

साळिदरांचा त्रास

‘चुनेकातर’ शेतात इतर जनावरांचा त्रास तसा कमी आहे, पण साळिंदरांची संख्या या भागात अधिक असल्यामुळे त्यांचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

मका, तेणली किंवा अन्य पिकांचे नुकसान त्यांच्याकडून होते. साळिंदरे जास्त करून रात्रीच्या वेळी या शेतात शिरतात व नुकसान करतात, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

तिखट मिरची

चुनेकातर शेतातील मिरचीला मोठा भाव आहे. जशी काणकोणची मिरची भाव खाते, त्याप्रमाणे कुंभारजुवेतील मिरचीलाही मोठी मागणी असते. उत्पादनापूर्वीच अनेकजण आपली मागणी नोंदवितात.

वर्षांची बेगमी करताना या मिरचीला स्वैपांक घरात मोठा मान (स्थान) आहे. मासे किंवा चिकण, मटणातही या मिरचीमुळे वेगळी रंगत येते, असे कुंभारजुवे, आमोणे, दिवाडी बेटावरील खवय्यांचे मत आहे. त्यामुळेच असेल कदाचित कुंभारजुवेतील तिखट मिरचीला अधिक मागणी असावी.

चवीला रूचकर

‘चुनेकातर’ शेतातील भाजीची चवच वेगळी आहे. येथील लालभाजी किंवा तेणली खाल्यानंतर सहजपणे कुंभारजुवेच्या शेतातील भाजी आहे, हे न सांगताही चवीने कळते.

त्यामुळे फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत माशेल, बाणास्तरी, कुंभारजुवे परिसरात खासकरून कुंभारजुवेची भाजी असेल तर हमखास घेतली जाते. येथील भाज्या रुचकर असूनही दरही मात्र सामान्यच असतात.

कृषिसंस्कृतीचे जतन

‘चुनेकातर’ येथील शेतकरी नफा कमावण्यासाठी शेती करीत नाहीत, तर आपली पारंपरिक शेती टिकविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. वर्षानुवर्षे शेती करणे सुरू आहे. ३० जणांची ही शेती असून किमान २०० ग्रामस्थ या शेतीत कष्ट करतात.

प्रत्येकजण शेतावर, कृषीसंस्कृतीवर प्रेम करणारे आहेत. त्यामुळेच हा परिसर बारामाही हिरवागार दिसतो. प्रत्येक मोसमात येथे शेती पिकवली जाते.

चविष्ट तेणली आणि मका

‘चुनेकातर’ शेतात काही शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली असून एका रोपाला किमान दोन ते तीन मक्याची कणसे लगडलेली आहे. त्यांची चवही वेगळीच आहे. झाडांवरचे कणस कच्चेही खाता येते, इतका चविष्टपणा त्या कणसात आहे.

शिवाय या ठिकाणी तेणलीही लागलेली आहे. तेणल्याच्या हिरव्यागार वेली बहरलेल्या आहेत. त्या वेलीत लुकलुकणारी तेणली लागली आहेत. तीही कच्ची खाणे खूपच आनंददायी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT