Goa Crime News : प्राध्‍यापक आत्महत्या प्रकरण; पत्नीविरोधात गुन्हा

मडगाव न्यायालयाच्या निर्देशानुसार केपे पोलिसांनी केली कारवाई
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News : दीड वर्षापूर्वी गूढरित्या आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या गोवा विद्यापीठाचे साहा. प्राध्‍यापक विशाल च्यारी मृत्यू प्रकरणात आता मडगाव न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिल्याने केपे पोलिसांनी त्यांची पत्नी प्राची हिच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्‍या 306 कलमाखाली (आत्महत्येस प्रवृत्त करणे) गुन्हा नोंद केला आहे.

Crime News
बेळगावच्या चोरट्यांनी चोरी केले 60 'डुक्कर', डिचोलीत गाडीचा टायर पंक्चर झाला अन्...

याबाबत केपेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, रविवारी आम्ही या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. लवकरच च्‍यारी यांच्‍या पत्नीला चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स पाठवू.

दरम्यान, या प्रकरणी महिला उपनिरीक्षक वेरोनिका कुतिन्हो या केसच्या तपास अधिकारी आहेत. मडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शांताश्री कुडचडकर यांनी हा गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. विशाल च्यारी यांच्या आई सुगंधा यांनी प्राची हिने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.

Crime News
Govind Gaude : पुणेकरांनाही भावला मंत्री गावडेंचा ‘संभाजी’; भूमिकेचे कौतुक

पारोडा जंगलात संपविले होते जीवन

मूळ बोरी येथील पण मेरशी येथे राहणारे प्रा. च्यारी 29 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परत आलेच नसल्याने ओल्ड गोवा पोलिस स्थानकात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली होती.

7 सप्टेंबर रोजी पारोडा-केपे येथील चंद्रनाथ पर्वत परिसरात त्यांची गाडी सापडली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागातील सर्व जंगल परिसर दोन दिवस पिंजून काढल्यावर दाट झाडीत एका झाडाला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com