Jail
Jail Dainik Gomantak
गोवा

Margao: गृह कर्ज घोटाळा प्रकरणात मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

कर्ज मिळविण्यासाठी मालमत्तेचे मूल्यांकन अहवाल खोटे वापरल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मडगावच्या शाखा कार्यालय क्षेत्र व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

( 3 people booked for LIC housing loan fraud at Margao )

याबाबत प्रकरणात मडगाव येथील रहिवासी मनोजकुमार कोडापुल्ली आणि राया येथील रहिवासी मेनिनो झेवियर यांच्या मालमत्तेच्या मूल्यांकनाची कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले आहे, तर हेमंत सुर्यवंशी हे एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मडगाव शाखेचे क्षेत्र व्यवस्थापक आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती देताना म्हटले आहे की, या तिघांनी पैसे मिळवण्यासाठी कट रचला आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, जोसेफ कीरांचिरा यांच्या मालमत्तेचे मूल्यांकनासाठी फेरफार करत स्वाक्षरी आणि रबर स्टॅम्प तयार केले, आणि दोन आरोपींच्या मालकीच्या मालमत्तेचे बनावट मूल्यांकन अहवाल तयार केले.

अहवाल तयार करण्यासाठी खोटी कागदपत्रे एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या मडगाव क्षेत्रीय कार्यालयासमोर खरी कागदपत्रे म्हणून सादर केली, ज्याच्या आधारे शाखा मॅनेजरने फसवणूक करून पहिल्या दोन आरोपींना कर्जाची रक्कम मंजूर केली आणि वितरित केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरोपींनी संस्थेचा वापर करत हातमिळवणी केली आणि पैसे मिळवले आहेत. त्यामुळे आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 465, 468, 471 आणि 120-बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT