Russia Ukraine War Dainik Gomantak
गोवा

युक्रेनमध्ये अडकलेले आणखी तीन गोमंतकीय विद्यार्थी सुखरूप मायदेशी

तीन विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडले असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

मडगाव : युक्रेनमध्ये युद्धामुळे अडकून पडलेले गोव्यातील आणखी तीन विद्यार्थी आज सुखरूपपणे मायदेशी परतले. त्यातील दाबोळी येथील मिहीर देशपांडे आणि बाणावली येथील जोलिफा गोइस हे दोघे गोव्यात पोहोचले असून सांत इनेज येथील सफन आल्मेदा हा दिल्लीत पोहोचला आहे. यापैकी मिहीर आणि जोफिला याना बुडापेस्ट (रोमेनिया) तून भारतात आणले गेले तर सफनला हंगेरीतून भारतात आणले गेले. हे तिन्ही विद्यार्थी काल रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले होते. (Russia Ukraine War News Updates)

गोवा एनआरआय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आता केवळ गोमंतकीय विद्यार्थीच देशात परत आणायचे उरले असून त्यातील तीन विद्यार्थी अजून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकून पडले आहेत. एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तीन विद्यार्थ्यांना (Student) युक्रेनबाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू असून दोन दिवसात याही विद्यार्थ्यांना आम्ही युक्रेनबाहेर काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यातील दाबोळी येथील मिहीर देशपांडे याला भारतीय एअर फोर्सच्या विमानाने भारतात आणले गेले. त्यानंतर गोवा सरकारच्या (Goa Government) अधिकाऱ्यांनी त्याला गोवा सदनमध्ये आणले. आज दुपारी तो दाबोळी विमानतळावर पोहोचला त्यावेळी विमानतळाबाहेर त्याची आई चैताली आणि वडील संदीप वाट पाहत उभे होते. मिहीर बाहेर आला त्यावेळी त्याच्या आईने त्याला घट्ट मिठी मारली. त्यावेळी तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. मुरगावचे मामलेदार रघुराज प्रभुदेसाई यांनी राज्य सरकारतर्फे त्याचे स्वागत केले. मिहिरचे वडील संदीप यांनी या संकटाच्या समई सर्व आधार दिल्याबद्दल भारत सरकार तसेच एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT