3 BJP MLAs from ponda oppose MGPs support  Dainik Gomantak
गोवा

मगोच्या पाठिंब्याबाबत भाजप तळ्यात-मळ्यात; फोंड्यातील 3 आमदारांचा विरोध

मडकईत भाजप विरोधात जहरी टीका

दैनिक गोमन्तक

फोंडा - राज्यात सतेवर येऊ पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने फोंडा तालुक्यातील चारही मतदारसंघातील भाजप मंडळाने तीव्र विरोध केला आहे. मगोला कोणत्याही स्थितीत सत्तेत घेऊ नका अशी जोरदार मागणी भाजपच्या फोंडा, शिरोडा, मडकई व प्रियोळ या चारही मतदारसंघातील मंडळ पदाधिकाऱ्यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत करून वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले आहे.

मगो पक्षाने भाजपविरोधात राज्यात उमेदवार उभे केले. भाजप उमेदवारांना पाडण्यासाठी मोठे षडयंत्र रचले. फोंडा तालुक्यातील फोंडा, (Ponda) शिरोडा, प्रियोळ या मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या विजयात खोडा घातला. मडकईत भाजप विरोधात जहरी टीका केली. तरीही एक मडकई सोडल्यास फोंडा शिरोडा आणि प्रियोळ या तिन्ही मतदारसंघात भाजपचेच उमेदवार निवइन आले ते केवळ सरकारची कार्यपद्धती आणि सर्वसामान्य नागरिकांचे हीत जपून गोव्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भाजप सरकार यशस्वी ठरले यामुळेच.

भाजपचे वीस उमेदवार निवडून आले तीन अपक्षांचा पाठिंबा आहे त्यामुळे मगोच्या पाठिंब्याची गरजच नाही असे भाजप मंडळाने स्पष्ट केले आहे. जिंकून येण्यासाठी भाजप कार्यकर्त्यानी मोठे परिश्रम घेतले मतदारांनी योग्य साथ दिली त्यामुळेच भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले.
निकाल लागण्यापूर्वी मगोचे नेते सुदिन ढवळीकर (Sudin-Dhavalikar) यांनी स्वतःच किंगमेकर असल्याचे जाहीर केले होते. डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री (CM) असेल तर मगोचा पाठिंबा देणार नाही अशी वल्गना करणाऱ्या सुदिन ढवळीकर यानी आता कशी काय नांगी टाकली असा सवाल भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप शेट, सूरज नाईक, दिलीप नाईक, सुदेश भिंगी व इतर भाजप मंडळ पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

निर्णय केंद्रीय नेत्यांवर
भाजप (BJP) मंडळ पदाधिकार्‍यांचा रोष वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोचला असून राज्यातील भाजप नेते मगोचा पाठिंबा घेण्यास अनुकुल नाहीत मात्र हा निर्णय केंद्रीय नेत्यांवर सोपवला असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले असल्याचे प्रदीप शेट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

फोड्यातील तीन आमदारांचा विरोध
फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक, (Ravi-Naik) शिरोड्याचे सुभाष शिरोडकर व प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी तर मगोपला कोणत्याही स्थितीत भाजपने जवळ करू नये असे म्हटले आहे. त्यामुळे मगो - भाजप एकत्र येणे मुश्किलीचे ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim: दाबोळीतील 'त्या' गाड्यामुळे वाहतुकीला धोका, स्थानिक रहिवाशांत नाराजी; ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याचा दावा

सखा सोबती बनला वैरी? सुरक्षेची जबाबदारी झटकून ट्रम्प आता ग्रीनलँड 'गिळंकृत' करणार? - संपादकीय

Weekly Finance Horoscope: जानेवारीचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी ठरणार 'गेमचेंजर'! नोकरी-व्यवसायात मोठी झेप! 'या' राशींचे आर्थिक प्रश्न सुटणार

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

SCROLL FOR NEXT