भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीही स्वस्त झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 1133 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 867 रुपयांची घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (7 ते 11 मार्च) 24-कॅरेट सोन्याचा दर 53,595 होता, जो शुक्रवारपर्यंत 52,462 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 70,580 रुपयांवरून 69,713 रुपये प्रति किलोवर आला आहे.
IBGA ने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या (gold) किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग शुल्कापूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु किमतींमध्ये GST समाविष्ट नाही.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
07 मार्च 2022- रुपये 53,595 प्रति 10 ग्रॅम
08 मार्च 2022 - 53,548 रुपये प्रति 10 ग्रॅम
09 मार्च 2022 - 53,541 रुपये प्रति 10 ग्रॅम
10 मार्च 2022- रुपये 52,880 प्रति 10 ग्रॅम
11 मार्च 2022- रुपये 52,462 प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
मार्च 07, 2022- 70,580 रुपये प्रति किलो
मार्च 08, 2022- 70,890 रुपये प्रति किलो
मार्च 09, 2022- 70,834 रुपये प्रति किलो
मार्च10, 2022- रुपये 69,815 प्रति किलो
मार्च11, 2022- रुपये 69,713 प्रति किलो
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.