Bike Fire in Verla Mapusa Dainik Gomantak
गोवा

Bike Fire in Goa : वेर्ला म्हापसा येथे अज्ञाताने दुचाकी जाळल्या

या संपूर्ण प्रकरणात घातपाताचा प्रकार असल्याची परिसरात चर्चा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa : म्हापशाजवळच असलेल्या वेर्ला परिसरात दुचाकींना अज्ञाताने आग लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. फ्रेतसवाडा वेर्ला येथे 3 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. योगेश मांद्रेकर यांच्या दुचाकींसह शेजारीच उभ्या असलेली चारचाकीचं आगीमुळे मोठं नुकसान झालं आहे. या संपूर्ण प्रकरणात घातपाताचा प्रकार असल्याची परिसरात चर्चा आहे.

बार्देश तालुक्यात दुचाकी जाळण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी कांदोळीत अशाच प्रकारे दुचाकींचं जळीतकांड समोर आलं होतं. किनाऱ्यावर लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या लाईफगार्ड्सच्या दुचाकी अज्ञाताने जाळल्या होत्या. कांदोळी किनाऱ्यावर लाईफगार्डच्या दुचाकींना अज्ञाताने आग लावल्याने एकच खळबळ उडाली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन दुचाकींमधील पेट्रोल काढूनच इतर सर्व दुचाकी पेटवण्यात आल्या आहेत. लाईफगार्ड्सना राहण्यासाठी दिलेल्या फ्लॅटखालीच या दुचाकी पेटवण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी पणजीतील काम्पाल मैदानाशेजारी दोन गाड्यांना भीषण आग लागल्याने दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले होते. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती. काम्पाल मैदानाशेजारी काही स्क्रॅपची वाहने लावलेली असतात. त्यातच अज्ञात माथेफिरुने ही आग लावल्याची चर्चा रंगली होती. आता पुन्हा म्हापशात अशाचप्रकारे गाड्या पेटवण्याचा प्रकार समोर आल्यामुळे पोलिसांसमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT