Goa Panchayat Elections  Dainik Gomantak
गोवा

सत्तरीत बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 294 उमेदवार रिंगणात; काणकोणातून 172 उमेदवार रिंगणात

सत्तरी तालुक्यातील एकूण बारापैकी सात पंचायतीमधून 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले

दैनिक गोमन्तक

वाळपई: सत्तरी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या निवडणुका 10 रोजी घेण्यात येणार आहे. आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 38 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे उमेदवारांची संख्या 294 राहिली आहे. पैकी सत्तरी तालुक्यातील एकूण बारापैकी सात पंचायतीमधून 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.

(294 candidates are in the fray for the election of twelve Gram Panchayats in Sattari Taluka)

या संदर्भाची अधिकृत घोषणा आज निवडणूक अधिकाऱ्यातर्फे करण्यात आली. उर्वरित उमेदवारांना 10 ऑगस्ट रोजी मतदारांच्या परीक्षेला बसावे लागणार आहे. 10 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात येणार असून 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत उमेदवारांना सर्वच मार्गाचा अवलंब करून यशाचा मार्ग निवडावा लागणार आहे

दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी उमेदवारा दबाव घालून आपल्या बिनविरोध यशाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला अजिबात दाद देण्यात आले नाही. त्यामुळे आता 10 पर्यंत प्रचाराला तेजी निर्माण होणार आहे.

सत्तरी तालुक्यातील एकूण बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत एकूण 97 प्रभागांमध्ये निवडणूक जाहीर करण्यात आली होती पैकी 11 उमेदवार बिनविरोध निवड झाल्यामुळे आता 86 प्रभागांमध्ये नवीन पंच निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

सत्तरी तालुक्याचे मामलेदार तथा निवडणूक अधिकारी कौशिक देसाई यांनी आपली यंत्रणा सज्ज केली असून गेल्या सहा दिवसापासून ते अत्यंत व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळाले .बुधवारी उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस होता.

ठाणे पंचायतीमधून सात पैकी एकूण तीन उमेदवार निवडून आलेले आहेत. यात निलेश परवार सरिता गावकर व सुभाष गावडे यांचा समावेश आहे. गुळेली पंचायती एकूण सात प्रभागापैकी 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये नितेश गावडे, अक्षिता गावडे यांचा समावेश आहे.भिरोंडा पंचायतीतून एकूण सात पैकी दोन बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत. उदयसिंग राणे व मनीषा पिळयेकर यांचा समावेश आहे. तर होंडा पंचायतीच्या एकूण अकरा प्रभागापैकी एक उमेदवार निवडून आलेल्या यात सुमेधा माडकर यांचा समावेश आहे.

सावर्डे पंचायत एकूण सात पंचायतमधून - शिवाजी देसाई बिनविरोध निवडून आले आहे. पिसुर्ले पंचायतीच्या एकूण सात प्रभागातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे. यामध्ये राजश्री जन्मी यांचा समावेश आहे. यामुळे सत्तरी तालुक्यातून एकूण दहा उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.

बिनविरोध निवड.

  • सावर्डे पंचायत - शिवाजी देसाई

  • म्हाऊस पंचायत -सोमनाथ काळे.

  • ठाणे पंचायत-सरिता गावकर, सुभाष गावडे.निलेश परवार.

  • गुळेली पंचायत -अक्षिता गावडे, नितेश गावडे.

  • भिरोंडा पंचायत -उदयसिह राणे, मनिषा पिळयेकर,

  • पिसुर्ले पंचायत -राजश्री जल्मी.

  • होंडा -सुमेधा माडकर.

दरम्यान, काणकोणात मधील सात पंचायतीच्या ५६ वार्डातून १७२ उमेदवार रिंगणात आहेत.तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी२९ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन निवडणूकीतून माघार घेतली.पैंगीण पंचायतीच्या महालवाडा वार्डातून सुनील पैंगणकर,गावडोंगरी पंचायतीतून धिल्लन उर्फ यशवंत देसाई व श्रीस्थळ पंचायतीतून राजेश वेळीप बिनविरोध निवडून आले आहेत.काणकोणात सात पंचायतीत एकूण ५९ वार्ड असून त्यापैकी तीन वार्डातून उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे त्यामुळे उर्वरित ५६ वार्डातून निवडणूक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT