पेडणे: पंचायतीच्या निवडणुकीच्या काळात रात्रो दहानंतर दारूची दुकाने सर्व बंद करावी यासंदर्भात पेडणे तालुका पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर, मोपा पोलीस निरीक्षक महेश केरकर, पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत आणि पोलीस फौजफाटा सहित पेडणे तालुक्यात जनजागृती करण्याची मोहीम 27 रोजी सायंकाळी राबवण्यात आली.
(Close liquor shops after 10 pm during election period, police awareness)
तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर दहा रोजी मतदान होणार आहे आणि 12 रोजी मतमोजणी होणार असल्याने या काळात पंचायत क्षेत्रात मधून निवडणुका होत आहे. त्या क्षेत्रातील सर्व जी विद्यालय दारूची दुकाने घाऊक सर्वसाधारण दुकाने आहेत ती दहा नंतर बंद करावी यासाठी पेडणे पोलिसांकडून जागृतीची मोहीम राबवण्यात आली आहे.
पेडणे तालुका पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश केरकर आणि पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सायंकाळी 27 रोजी धारगळ ते मोपा विमानतळ परिसरात दारूची दुकाने आहेत त्याठिकाणी जाऊन निवडणुकीच्या काळात रात्री दहानंतर दुकाने चालू न ठेवण्याची सूचना केलेली आहे आणि त्यासाठी सर्व विक्रेत्याने व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.