सांगे आयआयटीला विरोध नको : काब्राल

शैक्षणिक प्रकल्पाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले.
MLA Nilesh Kabral said that he has full support for the IIT educational project
MLA Nilesh Kabral said that he has full support for the IIT educational projectDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: सरकार राज्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देत आहे व यासाठी अनेक चांगले प्रकल्प चाळीस लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे पण काही मोजके लोक प्रत्येक कामाला विरोध करतात हे चांगले नव्हे. सांगे मतदारसंघात होऊ घातलेल्या आयआयटीमुळे फक्त सांगेलाच नाही तर कुडचडे मतदारसंघाला सुद्धा फायदा होणार असल्याने या शैक्षणिक प्रकल्पाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले.

(MLA Nilesh Kabral said that he has full support for the IIT educational project)

MLA Nilesh Kabral said that he has full support for the IIT educational project
248 उमेदवारांपैकी 28 उमेदवारांनी आपले अर्ज घेतले मागे

वीज खात्याने सांगेत अयोजित केलेल्या उज्वल भारत उज्वल भविष्य या कार्यक्रमात काब्राल बोलत होते. यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सांगेच्या नगराध्यक्षा श्वेता नाईक तारी तसेच वीज खात्याचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सांगे मतदारसंघात गोव्याचे सर्वात मोठे धरण असून या धारणावेळी लोकांनी या धरणाला विरोध केला असता तर दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा झाला असता का असा प्रश्न काब्राल यांनी उपस्थित केला.

आयआयटीमुळे सांगे व कुडचडे मतदारसंघाला प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार असून फक्त विरोधा साठी विरोध करू नये असे त्यांनी सांगितले. साळावली धरणासाठी पूर्वजांनी आपले गाव सोडून दिले होतें, त्यांच्या त्या बलिदानामूळे आज संपूर्ण दक्षिण गोव्याची तहान भागत आहे असे त्यांनी सांगितले. देशभरात कोळशाच वापर करुन वीज निर्मिती केली जाते. गोव्याला वीज मिळावे यासाठी दुसऱ्या देशात कोळसा जळतो. तनमार प्रकल्प ही काळाची गरज आहे. दर वर्षी पाच टक्के विजेची आम्हाला गरज भासते त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तमनार प्रकल्प होणे गरजेचे आहे असे काब्राल म्हणाले.

MLA Nilesh Kabral said that he has full support for the IIT educational project
काणकोणमध्ये पंचायत निवडणूकीवर बहिष्कार

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की काही मोजकेच गट असे आहेत की कोणत्याही प्रकल्पांना विरोध हे त्यांचे नित्याचेच काम झाले आहे.लोकांना मोबाईल हवे आहेत पण टॉवर नको,विध्युत उपकरणे हवी आहेत पण विज निर्मितीसाठी सरकार आणत असलेल्या प्रकल्पाना विरोध केला जात आहेत. गोव्याला रोजगाराच्या संद्या हव्या आहेत.विनाकारण विरोध करत राहिल्यास भविष्यात कोणीही गोव्यात गुंतवणूक करण्याचे धाडस करणार नाहीत अशी चिंता फळदेसाई यांनी व्यक्त केली.सांगेत होणारा आयआयटी हा शुद्ध हरित प्रकल्प आहे. त्यातून कोणत्याही स्वरूपाचे प्रदूषण होणार नाही.लोलये,त्यांतर सांगे ,नंतर मेळावलीत आणि आता पुन्हा सांगेत आयआयटीला विरोध होत आहे. हा प्रकल्प सरकारी जागेत होत असुन काही जण आपण शेतकरी असल्याचे भासवून आयआयटीच्या नावाने राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला. सोशियल मिडीयावर आयआयटीच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी आयआयटीसाठी निवडलेल्या त्या साडेसात लाख चौरस मीटरच्या जागेत किती लोक शेती करतात हे स्वतः येऊन पाहावे असे आवाहन केले.पहिल्याच वेळा एखादया प्रकल्पासाठी सांगेवासीय एकत्रित आलेले आहेत.संबंधित घटकांशी आपण चर्चा केली आहे.त्यांना चांगल्याप्रकारे सरकार नुकसानभरपाई देणार आहे.आम्हीं हा आयआयटी प्रकल्प मागील दारातून आणलेला नाही असे फळदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com