Crypto Dainik Gomantak
गोवा

क्रिप्टो करन्सी, फॉरेक्स ट्रेडिंग'च्या नावाखाली 2,500 कोटींची फसवणूक; गोवा, गुजरातसह विविध राज्यात जाळे

एसआयटीने आतापर्यंत या प्रकरणात चार मुख्य सराईतांसह सुमारे दोन डझन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Fraud Case: हिमाचल प्रदेशात 'क्रिप्टो करन्सी'च्या नावाखाली एक लाख जणांची फसवणूक करण्यात आली आहे. यात गुंतवणूकदारांची 2,500 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाली आहे. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर एसआयटीने आतापर्यंत या प्रकरणात चार मुख्य सराईतांसह सुमारे दोन डझन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्यातील जनतेचा कष्टाचा पैसा लुटल्याने संपूर्ण हिमाचलमध्ये अनेक लोकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे. सध्या सर्वत्र हे प्रकरण चर्चेत आहे. 'फॉरेक्स ट्रेडिंग'च्या माध्यमातून देखील अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले.

या फसवणूक प्रकारात पंजाबमधील झिरकपूर आणि मंडीतील नागचाला येथील 'क्यूएफएक्स'ची दोन कार्यालये सील करण्यात आली आहेत. विना परवाना ही कार्यालये सुरू असल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असता मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये आतापर्यंत 210 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे, असे मंडीचे पोलीस अधीक्षक सौम्या सांबसिवन यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

फसवणुकीचे हे जाळे पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली यासह गुजरात आणि गोव्यापर्यंत पसरलेले आहे. यात अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

तक्रारींच्या आधारे तपास सुरू केला असता दोघांना अटक करण्यात आली. यातील एका आरोपीला दिल्ली विमानतळावरून पकडण्यात आले आहे, तो परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.

पोलिसांनी संशयित आरोपींची 30 लाख रुपयांची बँक खाती जप्त केली आहेत. मात्र, मुख्य आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून त्याची चौकशी सुरू आहे.

पोलिस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, क्रिप्टो करन्सीप्रमाणेच 'फॉरेक्स ट्रेडिंग'च्या नावावरही मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. गुंतवणूक आणि मोठा परतावा देण्याच्या आमिषांपासून नागरिकांनी सावध राहावे आणि अशी गुंतवणूक टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Drone Attack: सुदानमध्ये क्रूरतेचा कळस! अल-फाशर येथील मशिदीवर ड्रोन हल्ला; 75 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

...तर सोमवारी गोवा बंद! आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम, मास्टरमाईंड शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Post Office Scheme: सुरक्षित पैसा, जबरदस्त परतावा! पोस्टाची 'ही' योजना तुम्हाला बनवते 'लखपती'; बिना रिस्क 15 लाखाहून अधिक मिळवण्याची संधी

Panjim Protest: 'नेपाळी गोव्यात येऊन धंदा करतोय...', आंदोलकांनी Swiggyच्या 'डिलिव्हरी बॉय'ला घेरत सरकारवर साधला निशाणा

Viral Video: पाणीपुरीसाठी महिलेचा राडा! भररस्त्यात बसून अडवली वाहतूक, म्हणते, 'मला दोन पाणीपुरी खाऊ घाला, नाहीतर...'

SCROLL FOR NEXT