Goa Saraswati Pujan Dainik Gomantak
गोवा

Mayem: 250 वर्षांपासूनची परंपरा, पोर्तुगीज काळापासून होतेय मयेतील ‘मेस्तां’च्या शाळेत सरस्वती पूजन

Saraswati Pujan Mayem School: जवळपास २५० वर्षांची परंपरा असलेल्या मयेतील मेस्तांच्या शाळेत यंदाही दसऱ्यापासून सरस्वती पूजन उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: पोर्तुगीज काळापासून साजऱ्या होणाऱ्या आणि जवळपास २५० वर्षांची परंपरा असलेल्या मयेतील मेस्तांच्या शाळेत यंदाही दसऱ्यापासून सरस्वती पूजन उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली आहे. सोमवारपर्यंत (ता.६) विविध कार्यक्रमांनिशी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

डिचोली तालुक्यातील मये गावात घरात सरस्वती देवीचे पूजन करण्यात येते. पोर्तुगीज काळापासून सुरू झालेली सरस्वती पूजनोत्सवाची ही परंपरा आजही अखंडितपणे टिकून आहे. ‘मेस्तां’च्या शाळेतील दहाजणांची सरस्वती, अशी ओळख असलेला हा उत्सव चतुर्थीच्या उत्सवाप्रमाणेच साजरा करण्यात येतो.

विजयादशमीपासून पाच दिवस हा सरस्वती पूजनोत्सव साजरा करण्यात येत आहे. केळबायवाडा-मये येथील च्यारी कुटुंबातील रत्नकांत च्यारी आणि त्यांचे पुतणे बाळकृष्ण च्यारी मिळून पाचवी पिढी आता हा सरस्वती पूजनोत्सव साजरा करीत आहे.

अकरावीत शिकणाऱ्या बाळकृष्ण च्यारी या विद्यार्थ्याने तर आपल्या घरातील सरस्वतीसमोर इको फ्रेंडली सजावट केली आहे. त्याने साकारलेला ‘राखणदार’ या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘मेस्तांची शाळा’ अशी ओळख

पोर्तुगीज काळात केळबायवाडा-मये येथे च्यारी कुटुंबाचा सुतार व्यवसाय चालत होता. पोर्तुगीज राजवटीत शाळा नव्हत्या, तरी काही भागात गुपचूपपणे शाळा भरत असत. च्यारी यांच्या घरीही अशीच शाळा भरायची. त्यामुळे त्यांच्या घराची ‘मेस्तांची शाळा’ अशी ओळख निर्माण झाली.

अडीचशे वर्षांपूर्वी या शाळेत सरस्वती पूजन करण्याचा गावातील दहाजणांकडून विचार पुढे आला आणि या शाळेत सरस्वती पूजण्यात आली. सरस्वती पूजनाला माटोळीसाठी लागणारी फळे आणि अन्य साहित्य दहाजणांकडून जमा करून हा उत्सव साजरा होऊ लागला, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

SCROLL FOR NEXT