Navratri Special: एका घराच्या गच्चीवर सुरु केलेले काम, पोचले हजारो मुलांपर्यंत! ‘रोबोटिक्स’ची ‘अ,आ,ई..’ शिकवणारी आधुनिक दुर्गा

Sunayana Shirodkar: ही कंपनी सुरू करण्यापूर्वी व्यवसायाने अभियंता असलेली आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सुनयना हिने सात वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले होते.
Sunayana Shirodkar
Robotics education GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सियर सोल्युशन्स’ या नावाने गोव्यातील ‘रोबोटिक्स’ विषयी माहिती देणारे/शिकवणारे आस्थापन २०१९ मध्ये सुरू करणाऱ्या सुनयना शिरोडकर यांनी काळाची चाल ओळखून त्यावर मात करण्याचे कसब आत्मसात केले आहे. सुरवातीला एका घराच्या गच्चीवर केवळ सात-आठ मुलांसाठी सुरू केलेले हे काम आता हजारो मुलांपर्यंत पोचले आहे. यामागे आहे तिची प्रचंड मेहनत, आपल्या कामावर असलेला विश्वास आणि सातत्य.

ही कंपनी सुरू करण्यापूर्वी व्यवसायाने अभियंता असलेली आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सुनयना हिने सात वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले होते. याच सात वर्षात तिला विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना काय पाहिजे आणि ते कसे शिकवता येईल याबाबतचा तिचाही अभ्यास झाला. केवळ पुस्तकी शिक्षण न देता प्रत्यक्ष काम करतानाचा अनुभव खूप महत्वाचा आहे, हे तिच्या लक्षात आले. याचा उपयोग पुढे रोबोटिक्स शिकवताना झाला.

आपल्या आई वडिलांकडून उद्योगाचा वारसा तिला होताच. लहानपणापासून आजूबाजूला व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले आजोबा म्हणजे गजानन शिरोडकर. त्यांची रियल ग्रुप ऑफ कंपनी ही खूप प्रसिद्ध होती. त्यांच्यात असलेले नेतृत्व, व्यवसायाची निष्ठा, असे अनेक गुण यामुळे मनात

कुठेतरी स्वत:च्या उद्योगाची आवड निर्माण झाली असावी. पुढे तिचे वडील उमेश शिरोडकर यांनी हा व्यवसाय आपल्या गावातून म्हणजे उसगाव येथून – फोंडा – मडगाव आणि गोव्यातील अनेक ठिकाणी नेला. कोणताही व्यवसाय करताना हवी असलेली शिस्त आणि सातत्य याचे धडे नकळत बालपणापासून मिळत होते.

तरीही प्रामुख्याने व्यवसाय हा पुरुषांनी करायचा, असे सर्वसाधारणपणे मानले जात होते. आणि आपण या कुटुंबातील पहिली महिला उद्योजक असल्याचा तिला सार्थ अभिमानही आहे. आजच्या व्यावहारिक जगात ‘कॉम्प्युटर वापरता येणे ही सगळीकडेच मूलभूत गरज झाली आहे , पण त्याचबरोबर रोबोटिक्स, आणि कोडिंग हे शिक्षणही आता छंद न राहता यापुढच्या काळात ही अत्यावश्यक बाब होणार आहे. आता याची गरज प्रत्येक क्षेत्रात असणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना हे शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘रोबोटिक्स’, ‘कोडिंग’ आणि ‘ए आय’ याचा अंतर्भाव अगदी शालेय पातळीवर केला आहे. याचे महत्व कळल्याने सरकारी शाळांत CARES या सारखे शैक्षणिक प्रकल्प सुरू झाले आहेत.

भविष्यात असे तांत्रिक ज्ञान असणे हे सगळ्याच क्षेत्रात गरजेचे आहे हे ओळखून विद्यार्थ्यांना शाळेत याचे सुरवातीचे शिक्षण द्यावे लागेल. सुनयनाचे ऑफिस दक्षिण गोव्यात फातोर्डा येथे आहे. राज्य पातळीवरील

उत्कृष्ट महिला अभियंता हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांकडून मिळाला. त्याच बरोबर उत्कृष्ट महिला स्टार्ट अप हाही आय टी क्षेत्रातील पुरस्कार मिळाला. यामुळे काम करायला अधिकच प्रोत्साहन आणि बळ मिळाले, असे ती आवर्जून सांगते. ‘नीती’ आयोग गोवा यांच्याकडूनही तिला सन्मानित केले होते.

Sunayana Shirodkar
GMC Goa: शस्त्रक्रिया क्षेत्रात पुढचे पाऊल! ‘गोमेकॉ’त लवकरच ‘Robotic Surgical Unit’; आरोग्यमंत्री राणेंनी दिली माहिती

२० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकवल्याने ‘सिक्स ब्रिक्स’ यांच्याकडून ‘ट्रेनर’ असे सर्टिफिकेट तिला मिळाले होते. या एवढ्या वर्षात शाळेबरोबर प्रशिक्षण घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना याला वैयक्तिक स्तरावर पाठवले आहे. मनोविकास , शारदा मंदिर, ग्रीन मेदोस,गुरुकुल, किस्ड नेस्ट, ज्ञान विकास सारख्या शाळांनी आपल्या कडे याला लागणाऱ्या लॅब तयार केल्या आहेत आणि आपल्या शिक्षणात याचा अंतर्भाव केला आहे.

Sunayana Shirodkar
Wolf Robo China: चीनच्या रोबोटिक लांडग्यांची दहशत, युद्धात करणार मोठे काम

‘रोबोटिक्स’मुळे एकाग्रतेत वाढ!

रोबोटिक्स , कोडिंग हे विषय शिकताना त्याच्यातील एकाग्रता वाढेल, त्यांना आपल्यापुढे आलेल्या समस्या सोडवताना उपयोग होईल, असेही निश्चितपणे सुनयना सांगतात. आरोग्य, शेती, पर्यावरण, वाहतूक ,एवढेच नाही तर कला क्षेत्रात ही या शिक्षणाचा उपयोग पुढच्या काही वर्षात होणार आहे. यासाठी या शिक्षणाला प्राथमिक स्तरावर तयार राहायला पाहिजे, असा सुनयना आग्रहाने सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com