Goa Murder News Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: धारबांदोडा येथे गळा चिरुन 25 वर्षीय तरुणीचा खून, घनदाट जंगलात आढळला मृतदेह

Darbandora Goa Murder Case: घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक दाखल झाले असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.

Pramod Yadav

धारबांदोडा: प्रतापनगर येथे २५ वर्षीय तरुणीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (१६ जून) सकाळी या मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, या तरुणीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत तरुणीची अद्याप ओळखी पटली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक शिवराम वायगणकर, फोंडा पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर तसेच कुळे पोलिस निरीक्षक राघोबा कामत घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक दाखल झाले असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.

खून झालेल्या मुलीची ओखळ अद्याप पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तरुणीचा खून करुन मृतदेह जंगलात फेकला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

गळा चिरुन आमानुष पद्धतीने २५ वर्षीय तरुणीचा खून करण्यात आला आहे. मुलीची ओळख न पटल्याने मुलगी मूळ गोव्याची आहे का? परराज्यातील यावरुन अद्याप पडदा उठलेला नाही. ओळख पटल्यास तिच्याबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच, मुलीचा खून कोणी केला? खूनाचे नेमके कारण काय? हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली असून, याबाबत लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Forensic Unit Goa

महिनाभराच्या कालावधीत पाच खून

एप्रिल महिन्याच्या अखेरीस वाळपईत श्रवण बर्वेच्या खून प्रकरणाने गोवा हादरला होता. यात त्याचेच वडिल आणि भाऊ यांचा सहभाग उघडकीस आल्याने प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते. यानंतर तसेच मुंगुल फातोर्डा येथे पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. यानंतर कोडार - फोंडा येथे दारुच्या नशेत मेव्हण्याने दाजीचा खून केला होता.

मिरामार येथील एका कॅसिनोत हैद्राबादच्या हिस्ट्री शीटरने सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची घटना मे महिन्यात घडली. शिरोड्यातही पतीने पत्नीचा खून केल्याची घटना मे महिन्यात घडल्याचे समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohan Agashe: 'गोव्याची जनता कला उपासक'! अभिनेते मोहन आगाशेंनी केले महोत्सवाचे कौतुक; ‘कृतज्ञता सन्‍मान’बद्दल मानले आभार

Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

Mopa Parking Fee: '..आम्ही घर कसे चालवू'? टॅक्सीचालकांची आर्त हाक; मोपावरील शुल्कवाढीबद्दल तीव्र नाराजी

Goa CAG Report: गोवा राज्याला 65.83 कोटींचा फटका! ‘कॅग’ अहवालाने ठेवले भोंगळ कारभार, भ्रष्ट प्रवृत्तीवर बोट

Sound Limit: 'गोव्यात ध्वनिमर्यादा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवा'! TTAG ची मागणी; नियोजनाअभावी ‘सनबर्न’ गेल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT