Husband missing Goa
Husband missing GoaDainik Gomantak

Goa Honeymoon Case: राजा रघुवंशी सारखी झाली असती आणखी एक हत्या; पत्नीसोबत गोव्याला निघालेला पती अचानक झाला गायब, धक्कादायक सत्य उघडकीस

Prayagraj Crime News: बेपत्ता झाल्याच्या दहा दिवसांनंतर तरुण अचानक घरी परत आला. तरुण घरी आल्यानंतर या प्रकरणाचे धक्कादायक सत्य समोर आले.
Published on

Goa Honeymoon Case: सोनम आणि राजा रघुवंशी हे धक्कादायक प्रकरण देशभरात गाजत असताना अशाच आणखी एका घटनेतून प्रयागराज येथील तरुण थोडक्यात बचावला आहे. इंदूर येथील सोनम आणि राजा शिलाँग येथे हनीमूनसाठी गेले असता राजाची सोनचा प्रियकर आणि काही गुंडांनी हत्या केली.

अशाच पद्धतीने प्रयागराज येथून पत्नीसोबत गोव्याला निघालेल्या तरुण अचानक गायब झाला. दहा दिवसांनी तरुण घरी आला त्यावेळी या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले.

प्रयागराज येथील सरायममरेज परिसरातील एका गावातील तरुणाचे काही महिन्यांपूर्वी भदोही येथील एक मुलीशी लग्न झाले होते. तरुण वडिलांसोबत गोव्यातील एका खासगी कंपनीत काम करत होता.

काही काळानंतर तरुणाची पत्नी देखील त्याच्यासोबत गोव्यात राहू लागली. काही दिवसांपूर्वी तरुण आणि त्यांची पत्नी गावाकडे आले होते. ०४ जून रोजी दोघेही गोव्याला परत जाण्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाले.

Husband missing Goa
घनदाट जंगलात आढळला तरुणीचा मृतदेह, उसगाव-तिस्क घटनेने अनेक प्रश्न निर्माण; पोलीस तपास सुरू

प्रयागराज येथून गोव्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी तरुण अचानक गायब झाला. तरुण अचानक गायब झाल्यानंतर त्याच्या घरच्यांनी याप्रकरणी सरायममरेज पोलिस स्थानकात तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, बेपत्ता झाल्याच्या दहा दिवसांनंतर तरुण अचानक घरी परत आला. तरुण घरी आल्यानंतर या प्रकरणाचे धक्कादायक सत्य समोर आले.

तरुणाने काय सांगितले?

प्रयागराज रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर पत्नीच्या ओळखीचे दोन तरुण तेथे आले. पत्नीसमोरच त्यांनी तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी तरुणाला सोबत घेऊन कोलकाता ट्रेनमधून निघून गेले. पत्नी स्थानकावरुन माघारी गेली.

Husband missing Goa
Margao: '11 वर्षांत कधी झाला नव्हता एवढा गोव्याचा विकास झाला'! आमदार दिगंबर कामत यांची PM मोदींवर स्तुतीसुमने

दोघांनी तरुणाला अनेक दिवस एका खोलीत कोंडून ठेवत जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणाने अखेर त्यांच्या तावडीतून सुटका करत १३ जून रोजी तिथून पळ काढत प्रयागराज येथील घर गाठले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com