Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका; वाकेड घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक

Mumbai Goa Highway Traffic Update: कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Traffic Disrupted On Mumbai Goa Highway Due To Landslide
Landslide On Mumbai Goa Highway
Published on
Updated on

रत्नागिरी: कोकणासह महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाचा मुंबई – गोवा महामार्गाला देखील मोठा फटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वाकेड घाटात दरड कोसळल्यामुळे महामार्गावरून सध्या एकेरी वाहतूक सुरु आहे. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली असून, दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी आता मार्केट परिसरात शिरण्यास सुरुवात झालीय. मुंबई – गोवा महामार्गावरील एका हॉटेलला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.

तसेच, माणगाव – रायगड येथील पळस गाव मार्गावर दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Traffic Disrupted On Mumbai Goa Highway Due To Landslide
Monsoon Fishing: ढगाळ वातावरण, उधाण आलेले पाणी; मान्सूनमधील गोमंतकीयांची 'नुस्तेमारी'

कोकणातून येणाऱ्या पर्यटकांमुळे माणगाव येथे वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावर सुमारे तीन किलोमीटर लांब रांगा पाहायला मिळाल्या.

याशिवाय संगमेश्वर कुरधुंडात संरक्षक भिंतीला तडे गेले असून, दुर्घटनेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. तसेच, राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. 

Traffic Disrupted On Mumbai Goa Highway Due To Landslide
Goa Honeymoon Case: राजा रघुवंशी सारखी झाली असती आणखी एक हत्या; पत्नीसोबत गोव्याला निघालेला पती अचानक झाला गायब, धक्कादायक सत्य उघडकीस

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट

कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com