Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

घरी राहण्यासाठी आला अन् घात केला, मायणा - कुडतरी येथे नातेवाईकाकडून 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार

पीडित तरूणीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संशयित आरोपी सध्या फरार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मायणा - कुडतरी येथून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. घरी राहण्यासाठी आलेल्या नातेवाईकाने जबरदस्तीने 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पीडित तरूणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संशयित आरोपी सध्या फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय संशयित पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असून, तो तरूणीच्या घरी राहण्यासाठी आला होता. पीडित तरूणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने 9 ते 20 जून या काळात तरूणीला धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

तसेच, आरोपीने तरूणीला झालेल्या प्रकराची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. संशियत सध्या फरारा असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित तरूणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षदा नाईक या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मैत्री, प्रेम अन् अघोरी छळ...! नग्न व्हिडिओ काढून केलं ब्लॅकमेल, चाकूनं वार करत तीन दिवस ठेवलं ओलीस; 19 वर्षीय विद्यार्थिनीवर नराधमाचा हल्ला

VIDEO: अनंत-राधिकाचा जबरदस्त 'स्वॅग'! मिका सिंगच्या गाण्यावर धरला ठेका, 30 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी गायकानं घेतले 'इतके' कोटी

Pakistan Air Strike: पाक-अफगाणिस्तान संघर्षात भारताची 'एन्ट्री'! अफगाण जनतेच्या सुरक्षेसाठी दिला पाठिंबा; 70 दहशतवादी मारल्याचा पाकड्यांचा दावा

Gonychi League T20: 8 चौकार, 5 षटकार...'धेंपो'च्या विजयात अभिनवची स्फोटक फलंदाजी

Goa Politics: खरी कुजबुज; एकी राहणार की तुटणार?

SCROLL FOR NEXT