Customs Museum Dainik Gomantak
गोवा

Customs Museum: 'धरोहर' संग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी 23.5 लाखांचा खर्च

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत झाले होते संग्रहालयाचे लोकार्पण

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी येथील सीमाशुल्क आणि केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. याच संग्रहालयात ऐतिहासिक जीएसटीचा (GST Museum Goa) समावेश करून त्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ‘धरोहर’ असे नामकरण करण्यात आलेल्या या संग्रहालयाचे उद्धाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (union finance minister Nirmala Sitharaman) यांच्या हस्ते 11 जून 2022 रोजी करण्यात आले. या उद्धाटन कार्यक्रमासाठी 23.5 लाख रूपयांचा खर्च केल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज (Aires Rodrigues) यांनी ही माहितीच्या अधिकाराचा वापर करत ही माहिती मागवली आहे. माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, या उद्धाटन कार्यक्रमासाठी 23 लाख 51 हजार 362 रूपये खर्च करण्यात आले आहेत. विन्सन ग्राफिक्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हे काम देण्यात आले होते. या कंपनीला धरोहरच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी 12 लाख 16 हजार 544 रूपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 1 लाख 18 हजार 200 रुपये उद्धाटन कार्यक्रमासाठी जी फुलांची सजावट करण्यात आली त्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. असे माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे विन्सन ग्राफिक्स याच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे काम देण्यात आले होते. मार्चमध्ये झालेल्या या 18 मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल 5.5 कोटी रूपये खर्च करण्यात आले होते.

सीमाशुल्क संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभासाठी, ध्वज, तागाच्या पिशव्या, काजू आणि कोकम शरबत, पडदे, ओळखपत्र आणि पार्किंग स्टिकर्स यावर लाखोंरूपये खर्च केल्याची माहिती, माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी 3,499 रूपयांची साडी भेट

उद्घाटन समारंभासाठी विशेष उपस्थित राहिलेल्या केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्री सीतारामन यांना यावेळी कुणबी साडी भेट देण्यात आली. या साडीची किंमत 3,499 रूपये एवढी असल्याचे या माहितीत म्हटले आहे.

चहा, काजू, स्टेशनरी

याशिवाय 25 तागाच्या पिशव्या, 55 कोकम ज्यूस आणि 55 अर्धा किलो काजूची पाकिटे यासाठी 1, 04, 589 रुपये खर्च करण्यात आले. 150 पाहुण्यांना देण्यात आलेल्या चहासाठी 62,212 रुपये खर्च करण्यात आले. स्टेशनरी वस्तूंवर 31,294 रुपये आणि चिन्हांसाठी 1,83,490 रुपये खर्च केले. समारंभाला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी भाड्याने घेतलेल्या 30 गाड्यांसाठी 2, 34, 780 रुपये देण्यात आले. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला त्या हॉलचे 2 लाख 17 हजार 828 रुपये भाडे देण्यात आले आहे.

असा वाढत गेला खर्च 9.75, 10.75 ते 19.75 लाख

'धरोहर' राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सुरुवातीला 9 लाख 75 हजार रुपये इतका अंदाजित खर्च होता. त्यानंतर वाढवून 10 लाख 75 हजार रुपये करण्यात आला. त्यानंतर पुन्हा त्यात वाढ करत 19 लाख 62 हजार 500 रुपये करण्यात आला.

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ने या संपूर्ण खर्चाची चौकशी करणे आवश्यक आहे. असे वक्तव्य अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी केले आहे. सीमाशुल्क संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात झालेल्या सर्व खर्च यासाठी योग्य प्रक्रिया आणि नियम पाळले गेलेत का. याची शहनिशा करायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT