Goa IMD: गोव्यात यलो अलर्ट! 18 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

सांगे, सत्तरी, धारबांदोडा या तालुक्यात वादळाची शक्यता
Goa Weather Forecast
Goa Weather ForecastDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात मागील दोन दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडत आहे. शुक्रवारी सत्तरी, वाळपईत मुसळधार पाऊस पडला. पावसाचे पाणी मार्केट तसेच, अनेकांच्या घरात शिरले. दरम्यान, गोवा हवामान (IMD Goa) खात्याने 18 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याप्रकरणी हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.

Goa Weather Forecast
Goa Police: लवकरच 'GTDC' कडून पोलिसांना मिळणार 'Thar'

उत्तर तसेच दक्षिण गोव्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, विजांचा कडकडाट होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सांगे, सत्तरी, धारबांदोडा या तालुक्यात वादळाची शक्यता असून, इतर तालुक्यात देखील याचा फटका बसेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Goa Weather Forecast
Sanguem: इको सेन्सिटिव्ह झोनला नागरिकांचा विरोध; मंत्री फळदेसाईंचाही पाठींबा

दरम्यान, वाळपईत शुक्रवारी सलग दोन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. काहींची दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले. वाळपई-होंडा रस्ता पाण्याखाली गेला होता. वाळपई सामाजिक रुग्णालयासमोर पूरस्थिती निर्माण झाली. यात काहींची वाहने अडकून पडली. तर, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

दूधसागर नदीचा प्रवाह शुक्रवारी अचानक वाढल्यामुळे 40 पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. येथे पर्यटकांसाठी बांधलेला लोखंडी साकव पलटी झाला होता. त्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे 16 तारखेपर्यंत दूधसागर धबधबा परिसर पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Oil Spill Road Accident Goa
 Goa land ,Environment Protection
Bombay High Court Goa verdict
Nutritionist Sushmitha Viral Instagram Post
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com