Lavoo Mamledar Dainik Gomantak
गोवा

Lavoo Mamledar Death Case: माजी आमदार लवू मामलेदार मृत्यूप्रकरणी 200 पानांचे आरोपपत्र दाखल, रिक्षाचालक आमिरवर खुनाचा आरोप

Ex-MLA Lavoo Mamledar Death Case: माजी आमदार लवू मामलेदार हे बेळगावात गेले असता रिक्षाचालक आमिर आणि लवू मामलेदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

Pramod Yadav

फोंडा: फोंड्याचे माजी आमदार तथा पोलिस खात्यातील सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक लवू मामलेदार यांच्या मृत्युप्रकरणी बेळगाव पोलिसांनी २०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात संशयित रिक्षाचालक आमिर सुहेल सनदी (२५) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

शवचिकित्सा अहवालात लवू मामलेदार यांचा मृत्यू मानसिक तणावाखाली हृदयविकारचा झटका आल्याने झाल्याचे समोर आले होते. यानंतर संशयित रिक्षाचालक अमीरसुहेल याच्याविरोधात खुनाचा खटला दाखल करण्याची मागणी केली जात होती. अखेर बेळगाव पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर बेळगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

गेल्या १५ फेब्रुवारीला माजी आमदार लवू मामलेदार हे बेळगावात गेले असता रिक्षाचालक आमिर आणि लवू मामलेदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यावेळी प्रकरण मारहाणीपर्यंत पोचल्यावर लवू मामलेदार हे खाली कोसळून गतप्राण झाले होते. त्यावेळी आमिर याला बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.

लवू मामलेदार कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध होतेच शिवाय कार्यदक्ष आमदार म्हणून देखील त्यांचा लौकिक होता. दरम्यान, बेळगावमध्ये कामानिमित्त वारंवार त्यांचे जाणं येणं व्हायचं. १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कारचा रिक्षाला किरकोळ धक्का लागला, याबाबत त्यांनी माफी देखील मागितली. पण, रिक्षाचालकाने त्यांना धक्काबुक्की केली. मामलेदार हॉटेलमध्ये जात असताना रिसेप्शनजवळ कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT