Patna Bihar Youth Died In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: होळीच्या दिवशी बिहारच्या युवकाने गोवा बीचवर असं काय खाल्लं की त्याचा मृत्यू झाला?

Baina Vasco Beach: युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

Pramod Yadav

वास्को: गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पटना, बिहारच्या २० वर्षीय युवकाने बायणा बीचवर काहीतरी खाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. शुक्रवारी (१४ मार्च) रोजी ही घटना उघडकीस आली.

अंकित वर्मा (वय २०, रा. पटना, बिहार) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. युवक वास्को जवळील बायणा बीचवर असताना त्याने काहीतरी अज्ञात पदार्थाचे सेवन केले. यानंतर त्याची प्रकृती खालवली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार, मुरगाव पोलिसांनी युवकाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

युवकाने अज्ञात पदार्थाचे सेवन केल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, हा पदार्थ कोणता? त्याचे किती प्रमाणात युवकाने सेवन केले होते? तसेच, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT