वाळपई: गेल्या दोन दिवसांपासून सत्तरी तालुक्याला जोरदार पावसाबरोबरच वादळी वाऱ्याचाही फटका बसला असून त्यात वीज खात्याची मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे. दिवसभरात 20 पेक्षा अधिक वीज खांब कोसळले असून, लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
(20 power poles fell due to storm in sattari)
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी खात्याची यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, ठिकठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. अग्निशामक दलाचे जवान झाडे कापण्याच्या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे पशुपती केंद्राला वादळाचा फटका बसला असून विजेचे सहा खांब मोडले आहेत. तसेच वेळगे येथेही वीजखांब उन्मळून पडले आहेत. परिणामी या भागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. वाळपई शहरात एक तर
होंडा परिसरातील एकूण सहा वीजखांब मोडल्यामुळे तीन लाखांची नुकसानी झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. यामुळे दिवसभरात जवळपास 20 खांब कोसळल्यामुळे खात्याचे सुमारे चार लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, सातोडे, आंबेशीवाडा-पर्ये, गवाणे, वेळूस, वाळपई-ठाणे रस्ता, चोर्लाघाट आदी ठिकाणी झाडे कोसळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.