Indian Passport Dainik Gomantak
गोवा

Illegal Bangladeshi Immigrants: बांगलादेशी घुसखोरांचा कारनामा; मुक्काम पुण्यात, पासपोर्ट गोव्यातून; अशी आहे 'मोडस ऑपरेंडी'

Bangladesh Migrant 20 Passport Cancelled By Goa: सांगवीतील १९ आणि दत्‍तवाडी पुणे येथे राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाने गोव्‍याच्‍या कार्यालयातून पासपोर्ट काढल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.

Pramod Yadav

Illegal Bangladeshi Immigrants In India

पुणे: पुण्यात घुसखोरी केलेल्या २० जणांनी गोवा कार्यालयातून पासपोर्ट तयार केल्याची माहिती उघडकीस आली असून, सर्व पासपोर्ट रद्द करण्यात आले आहे. गोवा कार्यालयाने याबाबतचे पत्र पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलिसांना दिले आहे. सांगवीतील १९ आणि पुण्‍यातील दत्‍तवाडी परिसरातील एका बांगलादेशी नागरिकाने गोव्यातून पासपोर्ट काढला होता. यासाठी निगडी पोलिसांनी जुलै २०२४ मध्‍ये पासपोर्ट रद्द करण्यासाठी पत्र पाठवले होते.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकाला गेल्या काही दिवसांपूर्वी एका विमानतळावरुन अटक करण्यात आली. अटक व्यक्ती निगडीतील साईनाथ नगर परिसरातील एका बांगलादेशी नागरिकाच्या संपर्कात असल्याची माहिती गुप्‍तचर विभागाला मिळाली. अधिक चौकशीत याप्रकरणात पासपोर्ट काढून देणार्‍या एजंटसह आणखी चारजणांना अटक करण्यात आली.

निगडी पोलिसांच्या चौकशीत सांगवीतील १९ आणि दत्‍तवाडी पुणे येथे राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाने गोव्‍याच्‍या कार्यालयातून पासपोर्ट काढल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. सापडलेल्या सर्व २० जणांचे पासपोर्ट रद्‌द करावे, असे पत्र निगडी पोलिसांनी गोवा पासपोर्ट कार्यालयास जुलै २०२४ मध्‍ये दिले. दरम्यान, हे सर्व पासपोर्ट रद्द केल्याचे गोवा कार्यालयाने कळवले आहे.

पासपोर्ट काढण्यासाठी अशी आहे मोड्स ऑपरेन्डी

बांगलादेशी नागरिक पश्‍चिम बंगालमध्‍ये घुसखोरी करुन तेथील शाळा, ग्रामपंचायतीचे बनावट शिक्‍केवापरून जन्म किंवा शाळा सोडल्‍याचा दाखला तयार करायचे. या दाखल्‍याच्‍या आधारे पुढे ते आधार आणि पॅनकार्डही काढतात. पुढे पुण्यासारख्या शहरात येऊन भाडेकरार करुन बँकेत खात उघडतात. अखेर या कागदपत्राच्या मदतीने आधारकार्ड अपडेट करुन पासपोर्टसाठी अर्ज करतात.

पासपोर्टसाठी गोवा कार्यालय का निवडले?

गोवा कार्यालयाचा पासपोर्ट मिळाल्‍यास व्‍हिसा मिळविण्‍यात अडचणी येत नाहीत. पुण्यातील बांगलादेशी घुसखोर त्यामुळे गोव्यातून पासपोर्ट काढत असे. याउलट पुण्यात पासपोर्ट मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो, असे घुसखोरांनी पोलिसांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT