Goa Casino: ED अधिकारी असली का नकली? पणजीतील कॅसिनोत रंगला हाय व्होल्टेज ड्रामा; छापा रोखला, अखेर पोलिस धावले मदतीला

ED Raid On Goa Casino: ईडीच्या अधिकाऱ्याने छापेमारी करताना कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार तपासणीसाठी चौकशी केला मात्र कॅसिनो कर्मचाऱ्यांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही.
Goa ED
Goa EDDainikGomantak
Published on
Updated on

ED Raid On Goa Casino

पणजी: कर्नाटकातील ईडीच्या पथकाने बुधवारी (११ डिसेंबर) गोव्यातील ऑफशोअर कॅसिनो जहाजावर छापा टाकला. पण, कॅसिनोतील Bouncer आणि कर्मचाऱ्यांनी अधिकारी भामटे असून, फसवणुकीच्या उद्देशाने आल्याचे समजून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पेचप्रसंगात अडकलेल्या ईडी अधिकाऱ्यांना अखेर कॅसिनोतून बाहेर पडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी कॅसिनोवर छापा टाकण्यासाठी गेले तेव्हा कॅसिनो सुरक्षा कर्मचाऱ्यांना ते खरे ईडी अधिकारी नव्हे तर तोतयागिरी व फसवणूक करणारे आहेत असे वाटले. त्यानंतर कॅसिनो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. ईडीच्या अधिकाऱ्याने छापेमारी करताना कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार तपासणीसाठी चौकशी केला मात्र कॅसिनो कर्मचाऱ्यांनी त्याला योग्य प्रतिसाद दिला नाही.

Goa ED
Suleman Khan: पोलिसानेच केली फितुरी! गोवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी पोलिस कॉन्स्टेबलसोबत कोठडीतून पसार

कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांनी ईडी अधिकाऱ्यांना चौकशी करण्यापासून रोखले आणि तपासात अडथळे निर्माण केले. काही कॅसिनो सुरक्षा कर्मचाऱ्यांना तर हे ईडीचे अधिकारी नसून ठगच आहेत असे वाटले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

गुरुवारी दुपारी ईडीच्या पथकाने स्थानिक पोलिसांकडून मदत घेतली, त्यानंतर पणजी पोलिस स्थानकाचे एक पथक ऑफशोअर कॅसिनो जहाजावर पाठवण्यात आले. पोलिसांची मदत मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापेमारीचे काम सुरु केले.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, कोट्यवधी रुपयांच्या फसव्या आर्थिक व्यवहार मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने गोव्यातील अनेक कॅसिनोवर छापे टाकले होते.

Goa ED
Manohar Parrikar Life Journey : उत्तमा आत्मना ख्याताः ! RSS ते गोव्याचे मुख्यमंत्री, पर्रीकरांचा जीवनप्रवास

ईडीच्या केरळ युनिटने हा छापा टाकला. गोव्यात मांडवी नदीवर असलेल्या जहाजांवर सहा ऑफशोर कॅसिनो आणि 11 जमिनीवरील कॅसिनो आहेत. प्रत्येक ऑफशोअर कॅसिनोची वार्षिक उलाढाल किमान 100 कोटी रुपये असण्याचा अंदाज असून, गोव्यात हा उद्योग रोजगाराचा प्रमुख स्रोत मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com